Lokmat Money > बिझनेस न्यूज > coronavirus : अफगाणिस्तान, फिलिपिन्स आणि मलेशियाच्या प्रवाशांना प्रवेशबंदी, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय

coronavirus : अफगाणिस्तान, फिलिपिन्स आणि मलेशियाच्या प्रवाशांना प्रवेशबंदी, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय

या उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपाच्या असून, ३१ मार्चपर्यंत त्या अंमलात राहतील. त्यानंतर, त्यांचा आढावा घेण्यात येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 05:43 AM2020-03-18T05:43:24+5:302020-03-18T05:43:37+5:30

या उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपाच्या असून, ३१ मार्चपर्यंत त्या अंमलात राहतील. त्यानंतर, त्यांचा आढावा घेण्यात येईल.

coronavirus : Afghan, Philippines and Malaysia's passenger access ban, decision to prevent corona infection | coronavirus : अफगाणिस्तान, फिलिपिन्स आणि मलेशियाच्या प्रवाशांना प्रवेशबंदी, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय

coronavirus : अफगाणिस्तान, फिलिपिन्स आणि मलेशियाच्या प्रवाशांना प्रवेशबंदी, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय

नवी दिल्ली : कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान, फिलिपिन्स आणि मलेशिया या देशांच्या प्रवाशांना भारतात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय भारत सरकारने मंगळवारी जाहीर केला. अतिरिक्त प्रवास सल्लापत्र (अ‍ॅडव्हायजरी) जारी करून हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.
या आधी सरकारने ११ मार्च आणि १६ मार्च रोजी या संदर्भातील दोन सल्लापत्रे जारी केली आहेत. आता तिसरे सल्लापत्र जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, अफगाणिस्तान, फिलिपिन्स आणि मलेशिया येथील प्रवाशांना भारतात प्रवेश करण्यास तत्काळ प्रभावाने प्रतिबंध करण्यात येत आहे. या देशांतून येणाऱ्या विमानांना भारतात उतरण्याची परवानगी देण्यात येणार नाही. या संदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने स्वतंत्र परिपत्रक जारी केले आहे.
या उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपाच्या असून, ३१ मार्चपर्यंत त्या अंमलात राहतील. त्यानंतर, त्यांचा आढावा घेण्यात येईल. या आधी सोमवारी जारी केलेल्या आदेशान्वये युरोपीय देश, तुर्कस्तान आणि ब्रिटन येथील प्रवाशांना १८ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत भारतात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या आधी केंद्र सरकारने युरोपीय राष्ट्रांतील प्रवासी व पर्यटकांना भारतात येण्यास बंदी घातली आहे. त्यांच्याकडे भारताचा व्हिसा असला, तरी त्यांना तूर्त भारतात प्रवेश दिला जाणार नाही.

हवाई शुल्कात ३० टक्के कपात करण्याची मागणी

मुंबई : कोविद-१९ विषाणूच्या साथीमुळे प्रचंड मंदीचा सामना करणाºया विमान वाहतूक उद्योगास दिलासा देण्यासाठी हवाई शुल्कात (एरॉनॉटिकल चार्जेस) सहा महिन्यांसाठी ३० टक्के कपात करण्याची मागणी बोर्ड आॅफ एअरलाइन्स रिप्रेझेंटेटिव्हज इन इंडिया (बीएएलआर) या संस्थेने केली आहे.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात नागरी उड्डयन सचिव प्रदीप सिंग खारोला यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. प्र्रतिनिधींनी म्हटले की, ‘साथीमुळे विमान वाहतूक उद्योगाच्या व्यवसायावर प्रचंड परिणाम होत आहे. हा उद्योग अस्तित्वासाठी झगडत आहे.’ हवाई शुल्कात रुट आणि टर्मिनल नेव्हिगेशन सेवांचा समावेश होतो.

Web Title: coronavirus : Afghan, Philippines and Malaysia's passenger access ban, decision to prevent corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.