Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोना, बिघडलेल्या संबंधांमुळे चीनमधील कापसाची निर्यात थांबली, दहा लाख गाठी पडून

कोरोना, बिघडलेल्या संबंधांमुळे चीनमधील कापसाची निर्यात थांबली, दहा लाख गाठी पडून

यंदा कोरोनामुळे सर्वच प्रकारच्या व्यवसाय, उद्योगधंद्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कॉटन क्षेत्रावरदेखील मोठा परिणाम झाला असून, जानेवारी महिन्यापासून कापसाच्या हंगामाला सुरुवात होत असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 03:31 AM2020-07-11T03:31:00+5:302020-07-11T03:31:46+5:30

यंदा कोरोनामुळे सर्वच प्रकारच्या व्यवसाय, उद्योगधंद्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कॉटन क्षेत्रावरदेखील मोठा परिणाम झाला असून, जानेवारी महिन्यापासून कापसाच्या हंगामाला सुरुवात होत असते.

Corona, strained relations halted cotton exports to China, dropping one million bales | कोरोना, बिघडलेल्या संबंधांमुळे चीनमधील कापसाची निर्यात थांबली, दहा लाख गाठी पडून

कोरोना, बिघडलेल्या संबंधांमुळे चीनमधील कापसाची निर्यात थांबली, दहा लाख गाठी पडून

- अजय पाटील
जळगाव : गेल्या चार महिन्यांपासून चीनमधून निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसच्या परिणामामुळे भारतातूनचीनमध्ये होणारी कापसाची निर्यात बंद आहे. त्यातच आता भारताचे राजकीय संबंध बिघडल्याने चीनला निर्यात होणाऱ्या १५ लाखांपैकी दहा लाख गाठी या पडून आहेत. त्यामुळे निर्यातदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. यासह कापसापासून तयार होणाºया यान (सूत)चीही निर्यात थांबली आहे, तर दुसरीकडे अनेक सौदे रद्द झाले आहेत.
यंदा कोरोनामुळे सर्वच प्रकारच्या व्यवसाय, उद्योगधंद्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कॉटन क्षेत्रावरदेखील मोठा परिणाम झाला असून, जानेवारी महिन्यापासून कापसाच्या हंगामाला सुरुवात होत असते.

स्पिनिंग, टेक्सटाइल्स मिलवर परिणाम

गेल्या काही वर्षांमध्ये कापूस उद्योगावर मोठा परिणाम झालेला आहे. अमेरिका व चीनमध्ये दोन वर्षांपासून सुरू असलेल्या ट्रेड वॉरमुळे आंतरराष्टÑीय बाजारात कापसाला जास्त किंमत नाही. दोन वर्षांपासून भारताच्या कापसाचे दरदेखील कमी होत आहेत. अनेक स्पिनिंग व टेक्सटाइल्स मिल व्यावसायिकांकडे गेल्या वर्षाचा माल शिल्लक होता. त्यातच पुन्हा यंदा चीनमधील निर्यात थांबल्याने भारतीय बाजारात मुबलक कापूस आहे. कोरोनामुळे देशातही चार महिन्यांपासून लॉकडाऊन झाल्यामुळे देशभरातील टेक्सटाइल्स मिल ६० ते ७० टक्के क्षमतेवर सुरू आहेत.

यंदा जानेवारीत चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आयात-निर्यातीवरदेखील चीनने काही वेळ बंदी घातली होती. कापूस बाजारात चीन हा भारताचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.

Web Title: Corona, strained relations halted cotton exports to China, dropping one million bales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.