Lokmat Money > बिझनेस न्यूज > सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! आता ब्रेड-बिस्किटांच्या किमती वाढण्याची शक्यता कमी, सरकारच्या 'या' निर्णयाचा परिणाम दिसणार!

सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! आता ब्रेड-बिस्किटांच्या किमती वाढण्याची शक्यता कमी, सरकारच्या 'या' निर्णयाचा परिणाम दिसणार!

जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या किमती ऐतिहासिकदृष्ट्या वाढत होत्या आणि भारत मोठ्या प्रमाणावर निर्यात करून या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 05:31 PM2022-05-16T17:31:13+5:302022-05-16T17:33:59+5:30

जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या किमती ऐतिहासिकदृष्ट्या वाढत होत्या आणि भारत मोठ्या प्रमाणावर निर्यात करून या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होता. 

consumer may get relief from price hike in wheat flour bread and biscuit  | सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! आता ब्रेड-बिस्किटांच्या किमती वाढण्याची शक्यता कमी, सरकारच्या 'या' निर्णयाचा परिणाम दिसणार!

सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! आता ब्रेड-बिस्किटांच्या किमती वाढण्याची शक्यता कमी, सरकारच्या 'या' निर्णयाचा परिणाम दिसणार!

नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात ब्रेड, बिस्किटे, केक यांसारख्या सर्वसामान्य ग्राहकांच्या वस्तूंच्या किमती वाढणार असल्याची चर्चा अलीकडेच होत होती. मात्र आता सरकारच्या निर्णयामुळे ही वाढ होणार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या किमती ऐतिहासिकदृष्ट्या वाढत होत्या आणि भारत मोठ्या प्रमाणावर निर्यात करून या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होता. 

अशा स्थितीत देशांतर्गत बाजारपेठेत गव्हाची खरेदी वाढल्याने त्याचे भावही असामान्यपणे वाढू लागले आहेत. त्याचा थेट परिणाम पीठासह गव्हापासून बनवलेल्या इतर उत्पादनांवर जसे की बिस्किटे, केक, ब्रेड आणि इतर सर्वसामान्य ग्राहकांच्या वस्तूंवर होतो. मात्र, सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालून ही संभाव्य महागाई जवळपास टाळली आहे.

केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, गेल्या एका वर्षात गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किरकोळ किमतीत 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण, गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे एक-दोन आठवड्यात देशांतर्गत किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. भारतातील गव्हाच्या उत्पादनात थोडीशी घट तसेच जागतिक पुरवठा कमी झाल्यामुळे त्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळेच गेल्या महिन्यात गहू आणि पिठाच्या देशांतर्गत किमतीत वाढ झाली होती.

भारतातील गव्हाच्या उत्पादनात होणारी संभाव्य घट आणि सरकारी खरेदीतील घट यांचा गव्हाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर (PDS) परिणाम होण्याची शक्यता नाही. पीडीसी सुरळीत चालू राहील, असे सुधांशू पांडे म्हणाले. याआधी वाणिज्य मंत्रालयाच्या परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) शुक्रवारी रात्री तत्काळ प्रभावाने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केल्यानंतर जागतिक मागणी वाढत होती आणि विविध देश त्यांच्या निर्यातीवर निर्बंध लादत होते. जागतिक बाजारपेठेत भाव केवळ सेंटिमेंटद्वारे ठरवले गेले. अशा परिस्थितीत निर्याशुतीवर बंदी घालणे आवश्यक झाले होते आणि आम्हाला विश्वास आहे की बंदी घातल्यानंतर धारणा देखील बदलतील, ज्यामुळे लवकरच त्याच्या किमती कमी होण्यास मदत होईल, असे सुधांशू पांडे यांनी सांगितले. 

(गव्हाच्या वाढत्या किमतीमुळे सरकारचा मोठा निर्णय, निर्यातीवर घातली सशर्त बंदी)

इतर देशांनी किंमत वाढवल्या
याचबरोबर, आजकाल जागतिक किमतींबरोबरच अनेक क्षेत्रांत महागाईही आयात केली जाते. गव्हाच्या बाबतीतही तेच होत होते. जागतिक पातळीवर गव्हाचे भाव वाढत आहेत. इतर देशांचा गहू 420-480 डॉलर प्रति टन या उच्च भावाने विकला जात होता. अशा परिस्थितीत देशांतर्गत किमती नियंत्रित करण्यासाठी आणि भारतीय ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्हाला निर्यातीवर निर्बंध लादावे लागले. आता किमती किती खाली येतील हे सांगता येत नाही, पण लवकरच त्याचे भाव नक्कीच खाली येतील, असेही सुधांशू पांडे यांनी सांगितले. 

Web Title: consumer may get relief from price hike in wheat flour bread and biscuit 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.