Lokmat Money > बिझनेस न्यूज > कर्मचारी घरून काम करत असल्याने कंपन्यांचा खर्च वाढला - एन. चंद्रशेखरन

कर्मचारी घरून काम करत असल्याने कंपन्यांचा खर्च वाढला - एन. चंद्रशेखरन

अन्य कोणतीही कंपनी विकत घेण्याचा टीसीएसचा सध्यातरी विचार नाही. मात्र परिस्थितीचा सारासार विचार करूनच दुसरी कंपनी ताब्यात घेण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 03:45 AM2020-06-13T03:45:10+5:302020-06-13T03:45:43+5:30

अन्य कोणतीही कंपनी विकत घेण्याचा टीसीएसचा सध्यातरी विचार नाही. मात्र परिस्थितीचा सारासार विचार करूनच दुसरी कंपनी ताब्यात घेण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

Companies' costs increased as employees worked from home | कर्मचारी घरून काम करत असल्याने कंपन्यांचा खर्च वाढला - एन. चंद्रशेखरन

कर्मचारी घरून काम करत असल्याने कंपन्यांचा खर्च वाढला - एन. चंद्रशेखरन

नवी दिल्ली : लॉकडाऊन काळात कर्मचारी घरून काम करत असल्याने कंपनी खर्चात कपात नव्हे तर वाढच झाली आहे, असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी कार्यालयांसाठी दीर्घमुदतीच्या भाडेपट्ट्यावर जागा घेतल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी घरातून जरी काम केले तरी खर्च कमी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे गुंतवणूक व वाढलेला खर्च अशा कात्रीत कंपन्या सापडलेल्या आहेत. भागधारकांच्या वार्षिक बैठकीमध्ये एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, आकस्मिक परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांनी घरातूनच काम करावे, असा निर्णय घेण्याची पाळी आली. त्याकडे तात्पुरता निर्णय या दृष्टीने टीसीएस पाहात नाही. टीसीएसने दूरगामी विचार करून पावले उचलली आहेत.
भागधारकांची वार्षिक बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेणारी टीसीएस ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे.

अन्य कंपन्या ताब्यात घेण्याचा विचार नाही
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर म्हणाले की, अन्य कोणतीही कंपनी विकत घेण्याचा टीसीएसचा सध्यातरी विचार नाही. मात्र परिस्थितीचा सारासार विचार करूनच दुसरी कंपनी ताब्यात घेण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. केवळ महसूल वाढावा म्हणून आम्ही वाट्टेल तसे निर्णय घेणार नाही. अनेक क्षेत्रांमध्ये टीसीएसला व्यवसाय वाढविण्याची संधी आहे.

Web Title: Companies' costs increased as employees worked from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.