Lokmat Money > बिझनेस न्यूज > कॉग्निझंटच्या १0 ते १२ हजार कर्मचाऱ्यांचा जाणार रोजगार; भारतीयांना बसेल फटका

कॉग्निझंटच्या १0 ते १२ हजार कर्मचाऱ्यांचा जाणार रोजगार; भारतीयांना बसेल फटका

खर्चात कपात करण्यासाठी घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 03:52 AM2019-11-01T03:52:41+5:302019-11-01T03:53:02+5:30

खर्चात कपात करण्यासाठी घेतला निर्णय

Cognizant will provide employment of 20 to 8 thousand employees; Indians hit the bus | कॉग्निझंटच्या १0 ते १२ हजार कर्मचाऱ्यांचा जाणार रोजगार; भारतीयांना बसेल फटका

कॉग्निझंटच्या १0 ते १२ हजार कर्मचाऱ्यांचा जाणार रोजगार; भारतीयांना बसेल फटका

बंगळुरू : भारतातील १0 शहरांमध्ये दीड लाखाहून अधिक कर्मचारी आणि जगभरात २ लाख ९0 हजार असलेल्या कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स या कंपनीने खर्चात कमी करण्यासाठी येत्या काही महिन्यांमध्ये किमान १0 ते १२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनेच ही माहिती दिली आहे.

ज्यांना कमी केले जाईल त्यापैकी भारतातील किती आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र जगभरातील मध्यम व वरिष्ठ पदांवरील १0 ते १२ हजार कर्मचाºयांना नोकरीतून कमी केले जाईल, असे कंपनीने नमूद केले आहे. कॉग्निझंट ही भारतातील दुसºया क्रमांकाची आयटी कंपनी असून, तिचे मुख्यालय अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये आहे. भारतात चेन्नई, बंगळुरू, मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद, कोच्ची, गुरूग्राम, कोइम्बतूर, नॉयडा, कोलकाता, मंगळुरू आणि कोलकाता येथे कार्यालये असून, त्यात दीड लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात.
कपातीच्या निर्णयामुळे केवळ २ टक्के लोकांचे रोजगार जातील, असे म्हटले आहे. पण ही संख्याही १२ हजारांहून अधिक होते. त्यात भारतातील काही कर्मचारी निश्चितच असतील. त्यामुळे देशातील कर्मचारी धास्तावले आहेत. 

कामगिरीत सुधारणा
कॉग्निझंडच्या कामगिरीमध्ये जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत चांगली सुधारणा झाल्याचे दिसत आहे. या काळात कंपनीचा एकूण महसूल ४.२५ अब्ज डॉलर्स झाला. त्याआधीच्या तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल होता ४.१४ अब्ज डॉलर्स. तरीही कंपनीने खर्चात कपात करण्याचा आणि त्यासाठी कर्मचाºयांना नोकरीतून कमी करण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

Web Title: Cognizant will provide employment of 20 to 8 thousand employees; Indians hit the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.