Lokmat Money > बिझनेस न्यूज > Citi Bank: बँकिंगच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक; ३,६५० कोटी चुकून ट्रान्सफर केले, जाणून घ्या प्रकरण

Citi Bank: बँकिंगच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक; ३,६५० कोटी चुकून ट्रान्सफर केले, जाणून घ्या प्रकरण

Citi Bank Accidently Sent $500 million to Revlon's lenders: कॉस्मेटिक कंपनी रेवलॉनला सिटी बँकेने चुकीने ३ हजार ६५० कोटी रक्कम ट्रान्सफर केली. एका अधिकाऱ्याने केलेल्या या चुकीमुळे आतापर्यत बँकेला ही रक्कम पुन्हा परत घेता आली नाही.

By प्रविण मरगळे | Published: February 17, 2021 03:28 PM2021-02-17T15:28:38+5:302021-02-17T15:29:28+5:30

Citi Bank Accidently Sent $500 million to Revlon's lenders: कॉस्मेटिक कंपनी रेवलॉनला सिटी बँकेने चुकीने ३ हजार ६५० कोटी रक्कम ट्रान्सफर केली. एका अधिकाऱ्याने केलेल्या या चुकीमुळे आतापर्यत बँकेला ही रक्कम पुन्हा परत घेता आली नाही.

Citi Bank: Citibank can't get back $500 million it wired by mistake, judge rules | Citi Bank: बँकिंगच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक; ३,६५० कोटी चुकून ट्रान्सफर केले, जाणून घ्या प्रकरण

Citi Bank: बँकिंगच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक; ३,६५० कोटी चुकून ट्रान्सफर केले, जाणून घ्या प्रकरण

Highlightsकंपनीही चुकून ट्रान्सफर झालेले पैसे पुन्हा परत देत नाही.कोर्टाने सिटी बँकेच्या या चुकीला बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक म्हटलं आहे.बँकेच्या तांत्रिक चुकीमुळे ५०० मिलियन डॉलर रक्कम कंपनीच्या खात्यात चुकीने ट्रान्सफर झाली.

नवी दिल्ली – मागील काही वर्षापासून भारताच्या बँकिंग क्षेत्रातून येणाऱ्या अशा अनेक बातम्यांनी सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे. आता ही बातमी सिटी बँकेबाबत(Citi Bank) आहे. बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चूक असल्याचं बोललं जात आहे. कॉस्मेटिक कंपनी रेवलॉनसंबंधित ही बातमी आहे. या कंपनीमुळे बँकेला ५० मिलियन डॉलर(जवळपास ३ हजार ६५० कोटी)चं नुकसान झालं आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया... (Biggest blunders in banking history court said to citi Bank)

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, कॉस्मेटिक कंपनी रेवलॉनला सिटी बँकेने चुकीने ३ हजार ६५० कोटी रक्कम ट्रान्सफर केली. एका अधिकाऱ्याने केलेल्या या चुकीमुळे आतापर्यत बँकेला ही रक्कम पुन्हा परत घेता आली नाही. कंपनीही चुकून ट्रान्सफर झालेले पैसे पुन्हा परत देत नाही. त्यामुळे हे प्रकरण अमेरिकेतील कोर्टापर्यंत गेले आहे. कोर्टाने सिटी बँकेच्या या चुकीला बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक म्हटलं आहे.

अशी झाली ही चूक?

हे प्रकरण २०१६ मधील आहे जेव्हा सिटी बँकेने कॉस्मेटिक कंपनी रेवलॉनला १.८ मिलियन डॉलर कर्ज दिलं होतं, कंपनीच्या बाँन्डच्या आधारे हे कर्ज वितरित करण्यात आले. परंतु बँकेच्या तांत्रिक चुकीमुळे ५०० मिलियन डॉलर रक्कम कंपनीच्या खात्यात चुकीने ट्रान्सफर झाली. बेँकेच्या मते, सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे ही रक्कम चुकीने ट्रान्सफर झाली. परंतु आता कंपनीने ही रक्कम बँकेला परत देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणावर अमेरिकेच्या कोर्टात सुनावणी सुरू आहे.

कोर्ट काय म्हणालं?

जवळपास ४ वर्ष कोर्टात हे प्रकरण सुरू आहे, अमेरिकन कोर्टाने स्पष्ट सांगितले की, बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चूक आहे. म्हणजे सिटी बँकेला स्वत:ची चूक मान्य करून नुकसान भरपाई द्यावी लागेल. त्यामुळे ३ हजार ६५० कोटींपासून बँकेला वंचित राहावं लागेल. यापूर्वी बँकांच्या संदर्भात असे अनेक प्रकरण समोर आले आहेत, परंतु ही घटना सर्वात मोठी आहे.

कोर्टाच्या निर्णयाशी बँक सहमत नाही

एएफपी रिपोर्टनुसार, सिटी बँकेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्ही कोर्टाच्या निर्णयाशी असहमत आहोत, ही रक्कम चुकीने ट्रान्सफर झाली आहे. ती परत मिळवण्यासाठी बँक प्रयत्न करत आहे. तर कंपनीने १९९१ मध्ये झालेल्या एका खटल्याचा आधार घेत म्हटलंय की, जर बँकेने चुकीने एखाद्याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले असतील तर ती बँकेची जबाबदारी आहे. ती ज्याच्या खात्यावर पैसे जमा झाले त्याची जबाबदारी नाही.  

Web Title: Citi Bank: Citibank can't get back $500 million it wired by mistake, judge rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.