Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनमध्ये बँकांतून मोठ्या रकमा काढण्यावर घालणार बंदी

चीनमध्ये बँकांतून मोठ्या रकमा काढण्यावर घालणार बंदी

नव्या बंधनांनुसार, व्यक्तींसाठी एक लाख ते तीन लाख युआनपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी पूर्वपरवानगीची गरज लागेल. व्यावसायांना पाच लाख युआनपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 03:49 AM2020-07-10T03:49:22+5:302020-07-10T03:49:36+5:30

नव्या बंधनांनुसार, व्यक्तींसाठी एक लाख ते तीन लाख युआनपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी पूर्वपरवानगीची गरज लागेल. व्यावसायांना पाच लाख युआनपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

China bans large withdrawals from banks | चीनमध्ये बँकांतून मोठ्या रकमा काढण्यावर घालणार बंदी

चीनमध्ये बँकांतून मोठ्या रकमा काढण्यावर घालणार बंदी

नवी दिल्ली : बँकांतून मोठ्या रकमा काढण्यावर बंदी घालण्याचा विचार चीन सरकारने चालविला आहे. प्रथम हेबेई प्रांतात पथदर्शक प्रकल्प म्हणून या उपाययोजना राबविल्या जातील. त्यानंतर इतर प्रांतांत तिचा विस्तार केला जाईल, असे पीपल्स बँक आॅफ चायनाने म्हटले आहे.
नव्या बंधनांनुसार, व्यक्तींसाठी एक लाख ते तीन लाख युआनपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी पूर्वपरवानगीची गरज लागेल. व्यावसायांना पाच लाख युआनपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

सरकारी सूत्रांनी सांगितले की, कुकर्जाचे वाढते प्रमाण आणि पैसे काढण्यासाठी बँकासंमोर होणारी तुफान गर्दी यामुळे या मर्यादा घालण्यात येत आहेत. एकाच वेळी असंख्य लोकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केल्यामुळे गेल्या महिन्यात दोन बँकांतील व्यवहारांवर सरकारला बंधने घालावी लागली होती. गेल्यावर्षी सरकारने अनेक बँकांचा ताबा घेतला होता.

बँकांतून पैसे काढण्यावर बंधने आणणारा चीनचा पथदर्शक कार्यक्रम दोन वर्षांचा असेल. यंदाच्या आॅक्टोबरमध्ये तो झेझियांग आणि शेनझेन प्रांतांत विस्तारित केला जाईल. हेबेईसह या तीन प्रांतातील ७0 दशलक्ष लोकसंख्या आहे. एकाच वेळी असंख्य लोक पैसे काढण्यासाठी आल्यामुळे अनेक स्थानिक बँका पैसे देण्यात असमर्थ ठरल्या आहेत. सरकारने हस्तक्षेप न केल्यास परिस्थिती आणखी विकोपाला जाण्याची भीती आहे.

Web Title: China bans large withdrawals from banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.