Lokmat Money > बिझनेस न्यूज > खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी; महागाई भत्त्यामध्ये वाढ जाहीर

खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी; महागाई भत्त्यामध्ये वाढ जाहीर

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ जाहीर करण्यात आली आहे. कामगार कार्यालयाने जारी केलेल्या एका डेटामधून यासंदर्भातील माहिती मिळाली आहे. 

By देवेश फडके | Published: January 30, 2021 03:34 PM2021-01-30T15:34:42+5:302021-01-30T15:36:17+5:30

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ जाहीर करण्यात आली आहे. कामगार कार्यालयाने जारी केलेल्या एका डेटामधून यासंदर्भातील माहिती मिळाली आहे. 

central government employees da increase as per 7th pay commission | खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी; महागाई भत्त्यामध्ये वाढ जाहीर

खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी; महागाई भत्त्यामध्ये वाढ जाहीर

Highlightsकेंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढकामगार कार्यालयाकडून डेटा जाहीरकेंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी

मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ जाहीर करण्यात आली आहे. कामगार कार्यालयाने जारी केलेल्या एका डेटामधून यासंदर्भातील माहिती मिळाली आहे. 

कामगार कार्यालयाने जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीतील ACIPI चा डेटा जारी केला आहे. यानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात निश्चित करण्यात आली आहे. कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने जून २०२१ पर्यंत महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याला स्थगिती दिली होती. 

Budget 2021: लघुउद्याेगांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी; गृहउद्योगांसाठी भरीव तरतूद करणे गरजेचे

महागाई दर ०४ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे. केंद्र सरकार वेळोवेळी त्यात सुधारणा करत असते. त्याची गणना टक्केवारीच्या मूलभूत वेतनवर आधारित आहे. आताच्या घडीला कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना स्वतंत्र महागाई भत्ता मिळत आहे, अशी माहिती AG ऑफिस ब्रदरहुडचे माजी अध्यक्ष आणि सिटीझन ब्रदरहुडचे अध्यक्ष हरीशंकर तिवारी यांनी दिली. काही जाणकारांच्या मते हा महागाई भत्ता पूर्णपणे करपात्र आहे. म्हणजेच, महागाई भत्त्याच्या नावाखाली मिळणारी रक्कम ही करपात्र धरली जाणार आहे.

महागाई भत्त्याचा संबंध थेट अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाशी असतो. त्याच्या सूत्रामध्ये एआयसीपीआयची सरासरी मोजली जाते. जून २०२१ पर्यंत महागाई भत्ता ३० ते ३२ टक्क्यांपर्यंत वाढेल. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात सुमारे १५ टक्क्यांची वाढ होईल. केंद्र सरकारकडून दर सहा महिन्यांनी त्यात सुधारणा केली जाते, असे हरिशंकर तिवारी यांनी सांगितले.

०१ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ पर्यंतची कोणतीही थकबाकी मिळणार नाही, असे केंद्र सरकारच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तर, जुलै २०२१ मध्ये महागाई भत्ता आणि डीआरसंदर्भात निर्णय होईल. याची अंमलबजावणी एक-एक करून केली जाणार आहे, असेही सरकारी आदेशात म्हटले आहे. 

Read in English

Web Title: central government employees da increase as per 7th pay commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.