Lokmat Money > बिझनेस न्यूज > ATM मधून कार्ड नसतानाही काढू शकता पैसे! जाणून घ्या, सोपी आहे पद्धत

ATM मधून कार्ड नसतानाही काढू शकता पैसे! जाणून घ्या, सोपी आहे पद्धत

खरे तर लोकांची सुरक्षितता लक्षात घेत आता अनेक बँकांनी ही सुविधा द्यायला सुरुवात केली आहे. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि अ‍ॅक्सिस बँक आदी कार्डलेस कॅश विड्रॉलची सुविधा देत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 08:52 PM2020-08-24T20:52:09+5:302020-08-24T20:57:38+5:30

खरे तर लोकांची सुरक्षितता लक्षात घेत आता अनेक बँकांनी ही सुविधा द्यायला सुरुवात केली आहे. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि अ‍ॅक्सिस बँक आदी कार्डलेस कॅश विड्रॉलची सुविधा देत आहेत.

Cardless cash withdrawal from ATM everything you need to know about this service | ATM मधून कार्ड नसतानाही काढू शकता पैसे! जाणून घ्या, सोपी आहे पद्धत

ATM मधून कार्ड नसतानाही काढू शकता पैसे! जाणून घ्या, सोपी आहे पद्धत

Highlightsएसबीआय, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि अ‍ॅक्सिस बँक आदी कार्डलेस कॅश विड्रॉलची सुविधा देत आहेत.यासाठी आपल्याला केवळ आपल्या बँकेचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन फोनवर इंस्टॉल करावे लागेल.कार्डलेस कॅश विड्रॉल सुविधेमुळे ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांनाही आळा बसेल.

नवी दिल्ली - कार्ड-लेस कॅश विड्रॉलची सुविधा आता अनेक बँकांकडून दिली जात आहे. कोरोना व्हायरसमुळे लोक अधिकाधिक कामे घरातूनच करत आहेत. सावधगिरी म्हणून लोक कामापुरतेच घराबाहेर पडत आहेत. असे असतानाच एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भात अनेक प्रकारच्या नव्या सुविधा असायला हव्यात, अशी गोष्ट समोर आली. यातच ही एक महत्वाची सुविधा आहे. यासाठी आपल्याला केवळ आपल्या बँकेचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन फोनवर इंस्टॉल करावे लागेल.

खरे तर लोकांची सुरक्षितता लक्षात घेत आता अनेक बँकांनी ही सुविधा द्यायला सुरुवात केली आहे. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि अ‍ॅक्सिस बँक आदी कार्डलेस कॅश विड्रॉलची सुविधा देत आहेत. या सुविधेअंतर्गत कार्डधारक ग्राहक आपल्या डेबिट कार्डशिवायही एटीएममधून पैसे काढू शकतात. मात्र, यासाठी त्यांना आपल्या फोनचा वापर करावा लागेल. पण ही सुविधा केवळ सेम बँक असलेल्या एटीएमवरच उपलब्ध आहे, इतर कुठल्याही बँकेच्या एटीएममध्ये ही सुविधा कामी येणार नाही, हे लक्षात ठेवणेही आवश्यक आहे.

कार्डलेस कॅश विड्रॉल सुविधेमुळे ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांनाही आळा बसेल. कारण मोबाईल पिन अथवा ओटीपीचा वापर करूनच पैसे काढले जातील. 

अशी आहे कार्डलेस विड्रॉलची प्रोसेस -
डेबिट कार्डचा वापर न करता एटीएममधून कॅश काढण्याची प्रक्रिया बँकांमध्ये वेगवेगळी असते. सर्वप्रथम ग्राहकाला आपल्या संबंधित बँकेचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. जर आपण एक SBI ग्राहक असाल, तर हे YONO अ‍ॅपवर उपलब्ध आहे. बँक ऑफ बडोदासाठी BOB MConnect plus आणि ICICI बँकेसाठी iMobile आहे. जर आपण SBI ग्राहक असाल, तर ‘YONO cash option’ वर जा, Bank of Baroda चे ग्राहक असाल तर 'कॅश ऑन मोबाईल'वर जा आणि ICICI बँकेचे ग्राहक असाल तर ‘card-less cash withdrawal’ ऑप्शनवर क्लिक करा.

बँक देवाणघेवाणीसाठी एका वेळी एकच पासवर्ड (ओटीपी) जनरेट करेल. यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर मेसेज येईल. उदाहरणार्थ - बँक ऑफ बडोदाचा एक ओटीपी 15 मिनिटांसाठी वैध आहे. आपल्याला डेबिट कार्डचा उपयोग न करता, कॅश काढण्यासाठी त्याच बँकेच्या एटीएमवर मिळालेल्या ओटीपीचा वापर करावा लागेल. 

देवाणघेवाणीची मर्यादा -
या सुविधेत दैनंदिन देवाणघेवाणीची मर्यादा आहे. ही मर्यादा 5,000 रुपयांपासून ते 20,000 रुपयांपर्यंत आहे. हा नियम बँकपरत्वे बदलतो. उदाहरणार्थ - आपण बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून 5,000 रुपये आणि एसबीआयच्या एटीएममधून 20,000 रुपये काढू शकतात. या सुविधेसाठी काही बँका अतिरिक्त शुल्कदेखील घेतात.

महत्त्वाच्या बातम्या -

सावधान! व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगद्वारे ब्लॅकमेलिंगचं प्रमाण वाढलं; सायबर पोलिसांचा सावधगिरीचा इशारा

कपिल सिब्बल, आझाद भडकताच 'हे' दिग्गज नेते राहुल गांधींच्या मदतीला; असे केले ट्विट...

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

Web Title: Cardless cash withdrawal from ATM everything you need to know about this service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.