Lokmat Money > बिझनेस न्यूज > अर्थमंत्र्यांच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर बैल उधळला

अर्थमंत्र्यांच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर बैल उधळला

सुमारे दोन महिन्यांपासून बाजाराला कवेत घेऊन बसलेल्या अस्वलावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कंपनी करामधील कपातीसह अन्य सवलतींद्वारे सर्जिकल स्ट्राइक केला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 12:52 PM2019-09-23T12:52:51+5:302019-09-23T12:53:07+5:30

सुमारे दोन महिन्यांपासून बाजाराला कवेत घेऊन बसलेल्या अस्वलावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कंपनी करामधील कपातीसह अन्य सवलतींद्वारे सर्जिकल स्ट्राइक केला

Bulls erupted after finance minister's surgical strike | अर्थमंत्र्यांच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर बैल उधळला

अर्थमंत्र्यांच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर बैल उधळला

- प्रसाद गो. जोशी
सुमारे दोन महिन्यांपासून बाजाराला कवेत घेऊन बसलेल्या अस्वलावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कंपनी करामधील कपातीसह अन्य सवलतींद्वारे सर्जिकल स्ट्राइक केला आणि मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाचा बैल उधळला. या निर्देशांकाने दशकातील एका दिवसातील सर्वाधिक वाढ नोंदविली. मात्र आगामी काळात सावधपणे व्यवहार करणेच महत्वाचे ठरणारे आहे.
मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ सलग तिसऱ्यांदा घसरणीने झाला. त्यानंतरही बाजार मंदीतच होता. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच अर्थमंत्र्यांच्या सर्जिकला स्ट्राईकनंतर बाजारात तेजी आली. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३७,२०४.५६ अंशांवर खुला झाला. त्यानंतर तो ३८,३७८.०२ ते ३५,९८७.८० अंशांदरम्यान हेलकावत सप्ताहाच्या अखेरीस ३८,०१४.६२ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या तुलनेत तो ६२९.६३ अंश (१.७ टक्के) वाढीव पातळीवर बंद झाला. शुक्रवारी बाजारात प्रचंड तेजी होती. या दिवशी निर्देशांकाने दशकातील सर्वाधिक एकदिवसीय वाढ नोंदविली. राष्टÑीय शेअर बाजारातही सप्ताहाच्या अखेरीस तेजी आली. येथील निर्देशांकात (निफ्टी) सप्ताहामध्ये १९८.३० अंशांची (१.८ टक्के) वाढ होऊन तो ११,२७४.२० अंशांवर बंद झाला.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मिडकॅपमध्ये चांगलीच म्हणजे ३.३ टक्के वाढ झाली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ४५४.४८ अंश वाढून १४,१२०.०७ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप हा निर्देशांक १३,२०४.२५ अंशांवर (वाढ १.५ टक्के म्हणजे १९१.२० अंश ) बंद झाला आहे. सलग चौथ्या सप्ताहात त्यामध्ये वाढ झाली .
अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या सवलतींमुळे वाढलेल्या बाजाराचा नफा कमविण्यासाठी वापर होईल. तसेच या सप्ताहात संपत असणाºया एफ अ‍ॅण्ड ओ व्यवहारांमुळेही बाजार खाली येऊ शकतो. आंतरराष्टÑीय बाजारातील खनिज तेलाचे दर आणि जागतिक घडामोडी यांच्यामुळेही बाजारावर परिणाम शक्य आहे.
>परकीय वित्तसंस्थांनी काढले ४१९३ कोटी रुपये
सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत परकीय वित्तसंस्थांनी भारतीय भांडवल बाजारामधून ४१९३ कोटी रुपये काढून घेतले आहेत. ३ ते २० सप्टेंबर या कालावधीमध्ये या संस्थांनी ५५७७.९९ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे. त्याचवेळी या संस्थांनी १३८४.८१ कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांची खरेदी केली आहे. याचाच अर्थ या संस्थांनी एकूण ४१९३.१८ कोटी रुपये भारतामधून काढून घेतले आहेत.
याआधी आॅगस्ट महिन्यामध्ये या संस्थांनी ५९२०.०२ कोटी रुपये तर जुलै महिन्यामध्ये २९८५.८८ कोटी रुपये भारतीय भांडवल बाजारामधून काढून घेतले आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये भांडवल वृद्धीवर वाढीव दराने अधिभार आकारणी करण्याचा प्रस्ताव आल्यापासून परकीय वित्तसंस्था या सातत्याने विक्री करीत होत्या. गतसप्ताहामध्ये अर्थमंत्र्यांनी या तरतुदी भांडवली नफ्याला लागू नसल्याचे जाहीर केल्याने या संस्था खरेदीस उतरू शकतात.

Web Title: Bulls erupted after finance minister's surgical strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.