Lokmat Money > बिझनेस न्यूज > Netflix : 'नेटफ्लिक्स'ने 300 कर्मचार्‍यांना कामावरून काढलं, जाणून घ्या कारण...

Netflix : 'नेटफ्लिक्स'ने 300 कर्मचार्‍यांना कामावरून काढलं, जाणून घ्या कारण...

Netflix : नेटफ्लिक्स आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची ही दुसरी वेळ आहे. 300 कर्मचारी हे कंपनीचे जवळपास 4 टक्के होते, जे आता बेरोजगार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 01:07 PM2022-06-24T13:07:59+5:302022-06-24T13:08:32+5:30

Netflix : नेटफ्लिक्स आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची ही दुसरी वेळ आहे. 300 कर्मचारी हे कंपनीचे जवळपास 4 टक्के होते, जे आता बेरोजगार आहेत.

biz netflix fired 300 employees know the reason | Netflix : 'नेटफ्लिक्स'ने 300 कर्मचार्‍यांना कामावरून काढलं, जाणून घ्या कारण...

Netflix : 'नेटफ्लिक्स'ने 300 कर्मचार्‍यांना कामावरून काढलं, जाणून घ्या कारण...

नवी दिल्ली : नेटफ्लिक्सने  (Netflix) आपल्या 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यासंदर्भात एक निवेदन जारी करताना नेटफ्लिक्सने सांगितले की, गेल्या दशकात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने स्ट्रीमिंग करणारे ग्राहक गमावले आहेत. त्यानंतर कंपनीने खर्च कमी करण्यासाठी नोकरीत कपात केली आहेत. नेटफ्लिक्स आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची ही दुसरी वेळ आहे. 300 कर्मचारी हे कंपनीचे जवळपास 4 टक्के होते, जे आता बेरोजगार आहेत.

कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम अमेरिकेतील बहुतांश कर्मचाऱ्यांवर झाला आहे. दरम्यान, कंपनीने गेल्या महिन्यात 150 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले टाकले होते, त्यानंतर आता नेटफ्लिक्सचा हा निर्णय समोर आला आहे. नेटफ्लिक्सने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही व्यवसायात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करत आहोत, मात्र आम्ही यासाठी हा निर्णय घेतला की आमचा खर्च स्लो रिव्हेन्यू ग्रोथच्या अनुषंगाने वाढू शकेल."

दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने काही दिवसांपूर्वीच व्याजदर वाढवले ​​आहेत, ज्याचा अमेरिकेवर वाईट परिणाम दिसायला लागला आहे. गेल्या अनेक दशकांच्या तुलनेत अमेरिकेतील महागाई या वर्षी अनेक पटींनी वाढली आहे. महागाई, युक्रेनमधील युद्ध आणि तीव्र स्पर्धेमुळे अलीकडच्या काही महिन्यांत जगातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा दबावाखाली आली आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, पहिल्या तिमाहीत ग्राहकांच्या संख्येत घट झाल्यानंतर, नेटफ्लिक्सने सध्याच्या कालावधीसाठी आणखी तोटा होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या डाउनट्रेंडला रोखण्यासाठी कंपनी एक स्वस्त प्लॅन, जाहिरात-समर्थित सबस्क्रिप्शन टियर सादर करण्याची योजना आखत आहे, ज्यासाठी नेटफ्लिक्स अनेक कंपन्यांशी बोलणी करत आहे.

एप्रिलमध्ये सबस्क्रायबर्समध्ये मोठी घट
एप्रिल महिन्यामध्ये सबस्क्रायबर्समध्ये मोठी घट झाल्याची नेटफ्लिक्स कंपनीने सांगितले आहे. ही दशकातील सर्वात मोठी घट आहे. यामुळे वॉल स्ट्रीटवर मोठा परिणाम झाला. शेअर बाजारात नेटफ्लिक्सच्या गुंतवणूकदारांना अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. या वर्षी कंपनीचा स्टॉक अंदाजे 70 टक्क्यांनी घसरला आहे. नेटफ्लिक्सकडे सध्या 221.6 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत.

Web Title: biz netflix fired 300 employees know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.