Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाईचा वार! साबण आणि डिटर्जंटचे दर २० टक्क्यांनी वाढले; HUL नं किमती वाढवल्या

महागाईचा वार! साबण आणि डिटर्जंटचे दर २० टक्क्यांनी वाढले; HUL नं किमती वाढवल्या

Soap-Detergent Price Hike: सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. आता साबण आणि डिटर्जंटची खरेदी करण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 04:37 PM2022-01-12T16:37:53+5:302022-01-12T16:38:56+5:30

Soap-Detergent Price Hike: सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. आता साबण आणि डिटर्जंटची खरेदी करण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

Big news for common man hul Hindustan Unilever hikes prices of soaps and detergents by 3 to 20 percent | महागाईचा वार! साबण आणि डिटर्जंटचे दर २० टक्क्यांनी वाढले; HUL नं किमती वाढवल्या

महागाईचा वार! साबण आणि डिटर्जंटचे दर २० टक्क्यांनी वाढले; HUL नं किमती वाढवल्या

Soap-Detergent Price Hike: सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. आता साबण आणि डिटर्जंटची खरेदी करण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. देशातील सर्वात मोठी एफएमसीजी विभागातील कंपनी असलेल्या हिंदुस्तान युनिलीवरनं (Hindustan Unilever) साबण आणि डिटर्जंटच्या किमती ३ टक्क्यांपासून ते २० टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. हिंदूस्तान युनिलिवर लिमीटेडच्या व्हील, रिन, सर्फ एक्सल आणि लाइफबॉय या उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यानं कंपनीनं वरील उत्पादनांच्या किमतीत वाढ केली आहे. इनपूट कॉस्टमधील वाढीमुळे कंपनीला गेल्या वर्षी देखील अनेक उत्पादनांच्या किमतीत वाढ करावी लागली होती. 

HUL नं सर्फ एक्सेल साबणाच्या किमतीत सर्वाधिक वाढ केली आहे. याआधी २ रुपयांची वाढ करावी लागली होती. कंपनीनं फक्त सर्फ एक्सल साबणाच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ केली आहे. आता सर्फ एक्सल साबणाची किंमत १० रुपयांऐवजी १२ रुपये इतकी झाली आहे. 

पीअर्स साबणाची किंमत ७ रुपयांनी वाढली
लाइफबॉयच्या १२५ ग्रॅम पॅकची किंमत २९ रुपयांवरुन ३१ रुपये इतकी केली आहे. तर पीअर्स साबणाच्या १२५ ग्रॅम बारची किंमत ७६ रुपयांवरुन आता ८३ रुपये इतकी झाली आहे. रिनसाठी कंपनीनं आपल्या बंडल पॅकची किंमत ७२ रुपयांवरुन ७६ रुपये इतकी केली आहे. यात २५० ग्रॅम सिंगल बारची किंमत १८ रुपयांवरुन १९ रुपये इतकी करण्यात आली आहे. 

बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार नोव्हेंबरमध्ये कंपनीनं आपल्या उत्पादनाच्या पोर्टफोलियोमध्ये किमतीत १ ते ३३ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

Web Title: Big news for common man hul Hindustan Unilever hikes prices of soaps and detergents by 3 to 20 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.