Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँक ऑफ महाराष्ट्र: बड्या कर्जदारांची सात हजार कोटींची थकबाकी

बँक ऑफ महाराष्ट्र: बड्या कर्जदारांची सात हजार कोटींची थकबाकी

राइट ऑफपैकी अडीचशे कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 01:52 AM2020-08-14T01:52:52+5:302020-08-14T01:53:03+5:30

राइट ऑफपैकी अडीचशे कोटींची वसुली

Big debtors owe Rs 7,000 crore to bank of maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र: बड्या कर्जदारांची सात हजार कोटींची थकबाकी

बँक ऑफ महाराष्ट्र: बड्या कर्जदारांची सात हजार कोटींची थकबाकी

पिंपरी : बँक आॅफ महाराष्ट्राच्या शंभर कोटी रुपयांवर थकबाकी असलेल्या कर्जदारांचे तब्बल ७ हजार शंभर कोटी रुपये राइट आॅफ (निर्लेखित) केले आहेत. त्यातील केवळ २५३ कोटी (४ टक्के) रुपयांची वसुली झाली आहे.

वेबिनारच्या माध्यमातून बँक आॅफ महाराष्ट्रची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. ११) पार पडली. त्यात सजग नागरिक मंचचे अध्यक्ष आणि बँकेचे सभासद विवेक वेलणकर यांनी शंभर कोटी रुपयांवर थकबाकी असलेल्या कर्जदारांची किती कर्जे बँकेने राइट आॅफ केली याची माहिती विचारली होती. गेल्या चार वर्षांत बँकेने ७ हजार १०० कोटी रुपयांची कर्जे राइट आॅफ केली आहेत. त्यातील अडीचशे कोटी रुपयांचीच वसुली बँक करू शकली असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

वेलणकर म्हणाले, गोपनीयतेच्या नावाखाली बड्या कर्जदारांची माहिती दिली नाही. स्टेट बँक आॅफ इंडियाने २२५ बड्या कर्जदारांची नावे देऊ शकते, तर बँक आॅफ महाराष्ट्र का देऊ शकत नाही. मुळात ही माहिती गोपनीय का ठेवायची? सामान्य कर्जदारांचे हप्ते थकल्यास त्यांच्या वसुलीसाठी नाव, गाव पत्त्यासह मालमत्तेच्या लिलावाची जाहीर नोटीस दिली जाते. त्यावेळी ही गोपनीयता आड येत नाही.

बँकेने एकूण किती कर्जे राइट आॅफ केली याची माहिती बँकेकडे मागितली होती. त्यावेळी मला संंकेतस्थळावरील अहवाल बघण्याचा सल्ला दिला. बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार २०१९-२० साली ५,६९७, २०१८-१९ मध्ये ५,१२७ कोटी, २०१७-१८ मध्ये २,४६० आणि २०१६-१७ मध्ये १३५७ कोटी रुपये राइट आॅफ करण्यात आले.

त्या वर्षाचा एनपीए कमी होण्यासाठी त्याचा उपयोग झाला. मात्र, कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने फारसे प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. त्यावर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचा (आरबीआय) अंकुश नसल्याचे दिसून येते. त्यामुळे बँकेचा कर्ज वसुलीऐवजी कर्जे राइट आॅफ करण्याकडे कल वाढला असल्याचे वेलणकर म्हणाले.

साडेचौदा हजार कोटींचे कर्जे राइट आॅफ
बँक आॅफ महाराष्ट्रने चार वर्षांत १४,६४१ कोटी रुपयांची कर्जे राइट आॅफ केली आहेत. त्यातील ७ हजार १०० कोटी रुपये शंभर कोटी रूपयांवरील बड्या थकबाकीदारांचे आहेत.

Web Title: Big debtors owe Rs 7,000 crore to bank of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.