Banks closed for five days in a row later this month? | Bank Strike : सलग पाच दिवस बँका राहणार बंद, आजच उरकून घ्या बँकेशी संबंधित व्यवहार...
Bank Strike : सलग पाच दिवस बँका राहणार बंद, आजच उरकून घ्या बँकेशी संबंधित व्यवहार...

मुंबई- बँकांशी संबंधित कोणतेही व्यवहार असल्यास ते 25 सप्टेंबरपूर्वीच करून घ्या, कारण 26 ते 29 पर्यंत बँका बंद राहणार आहेत. विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या विलिनीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी 26 आणि 27 सप्टेंबरला संपावर जाणार आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहार ठप्प होणार आहे. तसेच 28 सप्टेंबर रोजी चौथा शनिवार आहे, 29 सप्टेंबरला रविवार असल्यानं त्यादिवशीही बँकांचं कामकाज ठप्पच राहणार आहे. 30 सप्टेंबर रोजी अर्धवार्षिक कामांच्या पूर्ततेसाठी कोणतेही व्यवहार होणार नसून 1 ऑक्टोबरला आता बँकांची कामं करावी लागणार आहेत. 

बँकेचे अधिकारी विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात आहेत. हा निर्णय मागे घेण्यासह अधिकाऱ्यांच्या पगाराचे पुनरीक्षण, मोठ्या कर्जदारांना कर्जमाफी देण्याऐवजी एनपीए खात्याची वसुली करून त्याचा फायदा छोट्या कर्जदारांना देणे, अतिरिक्त शुल्क वसुली बंद करावी आणि बँकांचे व्यवहार आठवड्यातून पाच दिवस करण्याची एआयबीओसीची मागणी आहे. या मागण्यांसाठी एआयबीओसीच्या बॅनरखाली नागपूर चॅप्टरशी जुळलेले विविध राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी 26 आणि 27 सप्टेंबरला संपावर जाणार आहेत. त्यांच्याकडे बँकांचे अधिकार असल्यामुळे या दिवसात व्यवहार होणार नाहीत.


दुसरीकडे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए) आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाने बँकांचे विलिनीकरण न करण्याच्या मागणीसाठी 22 ऑक्टोबरला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सिंडिकेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही शुक्रवारी विलीनीकरणाच्या विरोधात आणि अन्य मागण्यांसाठी निदर्शने केली.

बँकिंग व्यवहार राहणार ठप्प
बँक अधिका-यांचा 26 आणि 27 सप्टेंबरला संप, 28ला चौथा शनिवार आणि 29ला रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. त्यानंतर 30 सप्टेंबरला बँकेच्या अर्धवार्षिक लेखा व्यवहारात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त राहतील. त्यामुळे 1 ऑक्टोबरलाच बँकांची कामं करावी लागणार आहेत. तसेच २ ऑक्टोबरला गांधी जयंती असल्यामुळे या दिवशी बँका बंद राहतील. याशिवाय सर्वच बँकांच्या एटीएममध्ये रोखीअभावी ग्राहकांना स्वत:च्या व्यवहारावर निर्बंध आणावे लागतील. अधिकाऱ्यांनी सलग सुट्यांचे नियोजन करून 26 आणि 27 सप्टेंबरला जाणीवपूर्वक संप पुकारल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या एकतर्फी निर्णयामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.

  • संघटनांच्या मागण्या

बँकांचे विलीनीकरण करू नये
पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा
रोख व्यवहारांसाठीची वेळ कमी करावी
वेतन आणि पगारात बदल करावे
ग्राहकांसाठीच्या सेवाशुल्कात कपात करावी
आरबीआयच्या नियमानुसार निवृत्तीवेतन द्यावे
एनपीएस रद्द करावा
बँकांमध्ये नोकरभरती करावी

 

  • सलग पाच दिवस बँका राहणार बंद
    26 आणि 27 सप्टेंबरः विलीनीकरणाविरोधात संप
    28 सप्टेंबर - चौथा शनिवार
    29 सप्टेंबर- रविवार 
    30 सप्टेंबर- अर्धवार्षिक हिशेब

English summary :
Bank Strike Update : Officials of nationalized banks will go on strike on September 26 and 27 against the central government's decision to merge various nationalized banks. Due to this banks will remain closed from 26 to 29.


Web Title: Banks closed for five days in a row later this month?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.