Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > UPI वापरकर्त्यांसाठी मोठी ऑफर! BHIM ॲप देणार १००% कॅशबॅक; मिळवण्यासाठी फॉलो करा 'हे' सोपे नियम

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी ऑफर! BHIM ॲप देणार १००% कॅशबॅक; मिळवण्यासाठी फॉलो करा 'हे' सोपे नियम

BHIM App Cash Back Offer : भारतात ऑनलाइन पेमेंट वेगाने वाढत आहेत. आता लहान दुकानदारांनाही UPI द्वारे पेमेंट स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. अशात भीम अॅपने एक अनोखी ऑफर आणली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:31 IST2025-12-09T12:11:58+5:302025-12-09T12:31:04+5:30

BHIM App Cash Back Offer : भारतात ऑनलाइन पेमेंट वेगाने वाढत आहेत. आता लहान दुकानदारांनाही UPI द्वारे पेमेंट स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. अशात भीम अॅपने एक अनोखी ऑफर आणली आहे.

BHIM UPI 100% Cashback Offer How to Avail up to ₹50 on Electricity Bill Payments | UPI वापरकर्त्यांसाठी मोठी ऑफर! BHIM ॲप देणार १००% कॅशबॅक; मिळवण्यासाठी फॉलो करा 'हे' सोपे नियम

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी ऑफर! BHIM ॲप देणार १००% कॅशबॅक; मिळवण्यासाठी फॉलो करा 'हे' सोपे नियम

BHIM App Cash Back Offer : आजच्या काळात जवळपास प्रत्येकजण ऑनलाइन पेमेंट करण्यास प्राधान्य देतो. ऑनलाइन पेमेंटमुळे ATM वरून वारंवार पैसे काढण्याची आणि सुट्ट्या पैशांची समस्या दूर झाली आहे. देशातील बहुतेक लोक पेमेंटसाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसचा वापर करतात. या पार्श्वभूमीवर, भीम पेमेंट्स ॲपने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ॲपने १०० टक्के कॅशबॅकची ऑफर जाहीर केली आहे.

१००% कॅशबॅक कसा मिळवायचा?
भीम ॲपने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे. भीम ॲप लवकरच आपला ९वा वर्धापनदिन साजरा करत आहे, याच निमित्ताने हे खास कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी वापरकर्त्याला किमान २० रुपयाचे व्यवहार करणे आवश्यक आहे. भीम ॲपच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या सर्व वापरकर्त्यांना या १०० टक्के कॅशबॅकचा लाभ घेता येईल.

वीज बिल भरल्यावरही कॅशबॅक
भीम ॲपवर सुरू असलेल्या कॅशबॅक ऑफर अंतर्गत आता वीज बिल भरतानाही ग्राहकांना बचत करण्याची संधी मिळत आहे. ही ऑफर बीएसईएस राजधानी पॉवर या पॉवर सप्लाय कंपनीने (जी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि दिल्ली सरकारचा संयुक्त उपक्रम आहे) सादर केली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, भीम ॲपद्वारे वीज बिल भरल्यास ग्राहकांना इन्स्टंट कॅशबॅक मिळू शकतो आणि ही सुविधा ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत उपलब्ध असेल. पेमेंट करताना चेकआऊटवर BillDesk पर्याय निवडणे आवश्यक आहे.

कॅशबॅकचे नियम आणि मर्यादा

  • मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रत्येक ग्राहक या ऑफरचा फायदा घेण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे.
  • ग्राहक या ऑफरचा फायदा महिन्यातून फक्त एकदाच घेऊ शकतात.
  • कॅशबॅक मिळवण्यासाठी किमान ५०० रुपयांचे बिल भरणे आवश्यक आहे.
  • ग्राहकांना जास्तीत जास्त ५० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो, जो थेट त्यांच्या भीम ॲपशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल.

वाचा - तुमची फ्लाईट लेट किंवा कॅन्सल झाली? मग तुम्हाला 'इतका' मोबदला मिळणे बंधनकारक! काय आहेत नवीन नियम?

भीम ॲपची गौरवशाली यात्रा
डिजिटल इंडियाची ओळख बनलेल्या भीम ॲपची सुरुवात ३० डिसेंबर २०१६ रोजी झाली होती. तेव्हापासून सुरू झालेल्या या प्रवासाने देशात डिजिटल पेमेंटला अत्यंत सोपे आणि विश्वासार्ह बनवले आहे. आपल्या वर्धापनदिनानिमित्त भीम ॲप आता आपल्या वापरकर्त्यांना हा मोठा कॅशबॅकचा लाभ देत आहे.

Web Title : UPI उपयोगकर्ताओं के लिए BHIM ऐप का बड़ा ऑफर: 100% कैशबैक!

Web Summary : भीम ऐप अपनी वर्षगांठ पर UPI लेनदेन पर 100% कैशबैक दे रहा है। बिजली बिल भुगतान (न्यूनतम ₹500) पर ₹50 तक कैशबैक पाएं। बिजली बिल भुगतान पर ऑफर दिसंबर 2025 तक मान्य है।

Web Title : BHIM App Offers 100% Cashback: Easy Steps for UPI Users

Web Summary : BHIM app celebrates its anniversary with a 100% cashback offer on UPI transactions. Users get cashback on bill payments (min ₹500), capped at ₹50. Offer valid until December 2025 for power bill payments.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.