Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकांच्या खासगीकरण प्रकरणी सरकार, संघटनांत चर्चा

बँकांच्या खासगीकरण प्रकरणी सरकार, संघटनांत चर्चा

खाजगीकरणाच्या विरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लाॅईज असोसिएशनने येत्या १५ आणि १६ मार्च रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 06:02 AM2021-03-07T06:02:17+5:302021-03-07T06:02:37+5:30

खाजगीकरणाच्या विरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लाॅईज असोसिएशनने येत्या १५ आणि १६ मार्च रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

Bank privatization case discussed in government, organizations | बँकांच्या खासगीकरण प्रकरणी सरकार, संघटनांत चर्चा

बँकांच्या खासगीकरण प्रकरणी सरकार, संघटनांत चर्चा

Highlightsखाजगीकरणाच्या विरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लाॅईज असोसिएशनने येत्या १५ आणि १६ मार्च रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या बँकांचे खासगीकरण करण्यास विरोध करणाऱ्या कर्मचारी संघटना आणि वित्त मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकरी यांनी नुकतीच चर्चा केली. तथापि, त्यांच्यात कोणत्याच मुद्द्यावर सहमती होऊ शकली नाही.

खाजगीकरणाच्या विरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लाॅईज असोसिएशनने येत्या १५ आणि १६ मार्च रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. संपात देशभरातील १० लाख बँक कर्मचारी सहभागी होतील, असे संघटनेने म्हटले आहे. हा संप मागे घेतला जावा, अशी सरकारची इच्छा आहे. बँक कर्मचाऱ्यांची शिखर संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या प्रतिनिधींनी ४ मार्च रोजी वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी ऑनलाईन चर्चा केली. अतिरिक्त मुख्य कामगार आयुक्तांची बैठकीला उपस्थिती होती, असे संघटनेचे निमंत्रक सी. एच. वेंकटचलम यांनी सांगितले. 

Web Title: Bank privatization case discussed in government, organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.