Lokmat Money > बिझनेस न्यूज > '...तर बँक अकाऊंटमधून पैसे गायब होतील', 'या' सरकारी बँकेने दिला इशारा

'...तर बँक अकाऊंटमधून पैसे गायब होतील', 'या' सरकारी बँकेने दिला इशारा

bank of india alert : कोरोना संकट काळात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 12:30 PM2021-05-04T12:30:18+5:302021-05-04T12:31:20+5:30

bank of india alert : कोरोना संकट काळात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

bank of india alert social engineering frauds using mobile number similar to banks toll free number | '...तर बँक अकाऊंटमधून पैसे गायब होतील', 'या' सरकारी बँकेने दिला इशारा

'...तर बँक अकाऊंटमधून पैसे गायब होतील', 'या' सरकारी बँकेने दिला इशारा

Highlightsजर एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाली असल्यास ते भारत सरकारच्या https://cybercrime.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करु शकतात.

नवी दिल्ली: जर तुमचे बँक खाते बँक ऑफ इंडियामध्ये (Bank of India) आहे, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोरोना संकट काळात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. तसेच, ग्राहकांना सोशल इंजिनीअरिंग फ्रॉडपासून सावध केले आहे. यासंदर्भातील माहिती बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. (bank of india alert social engineering frauds using mobile number similar to banks toll free number)

...तर बँक अकाऊंटमधून पैसे गायब होतील
बँक ऑफ इंडियाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ग्राहकांनी कोणत्याही फोन किंवा इतर मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली वैयक्तिक माहिती उघड करू नये. जर ग्राहकांनी असे केले तर त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. अकाऊंटमधून पैसे गायब होऊ शकतात. याचबरोबर, टोल फ्री नंबरसारख्या मोबाईल नंबरचा वापर करून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कोणत्याही फोनवर किंवा मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले PIN, CVV, OTP आणि कार्ड डिटेल्स देऊ नका, असे बँकेने म्हटले आहे.

ऑनलाइन फसवणूक झाल्यास तक्रार कुठे करणार?
ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने सरकारी आणि खासगी बँका ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून सतर्क करत असतात. जर एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाली असल्यास ते भारत सरकारच्या https://cybercrime.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करु शकतात.

ही महत्वाची माहिती शेअर करु नका
ग्राहकांनी कोणालाही पॅन कार्ड (PAN Card) माहिती, आयएनबी प्रमाणपत्रे, मोबाइल नंबर, यूपीआय पिन, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम पिन आणि यूपीआय व्हीपीए सांगू चुकूनही सांगू नका. जर तुम्ही कोणतीही खासगी माहिती एखाद्याबरोबर शेअर केली तर तुमचे अकाऊंट रिकामे होऊ शकते.

ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
कोरोना संकट काळात डिजीटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. डिजीटल आणि ऑनलाइन व्यवहार वाढल्याने ग्राहकांना विविध मार्गाने फसवले जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहणे गरजेचे आहे. ऑनलाइन व्यवहार वाढत असल्याने ग्राहकांनी त्यांची खासगी माहिती शेअर करताना सतर्कता बाळगली पाहिजे.
 

Web Title: bank of india alert social engineering frauds using mobile number similar to banks toll free number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.