lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'राजकीय आव्हानामुळे बँक ऑफ इंग्लंडमध्ये रस नाही'

'राजकीय आव्हानामुळे बँक ऑफ इंग्लंडमध्ये रस नाही'

रघुराम राजन; बँक बनली अधिक राजकीय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 02:20 AM2019-07-22T02:20:06+5:302019-07-22T02:20:27+5:30

रघुराम राजन; बँक बनली अधिक राजकीय

Bank of England is not interested in political challenges | 'राजकीय आव्हानामुळे बँक ऑफ इंग्लंडमध्ये रस नाही'

'राजकीय आव्हानामुळे बँक ऑफ इंग्लंडमध्ये रस नाही'

ब्लूमबर्ग : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले आहे की, ब्रेक्झिटमुळे निर्माण झालेल्या राजकीय आव्हानामुळे बँक ऑफ इंग्लंडमध्ये उच्च पदासाठी अर्ज केला नाही. एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
या बँकेचे प्रमुख मार्क कार्नी हे जानेवारीत पद सोडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जागी रघुराम राजन यांची नियुक्ती होणार, असी चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. राजन यांनी एकप्रकारे या चर्चेला आता पूर्णविराम दिला आहे. दिलेल्या मुलाखतीत रघुराम राजन म्हणाले की, अलीकडच्या काळात इंग्लंडमधील ही केंद्रीय बँक अधिक राजकीय झाली आहे. एखादा देशाचा सर्वात चांगला व्यक्ती तो असू शकतो, जो त्या देशाची राजकीय परिस्थिती समजून ती हाताळू शकतो. इंग्लंडचा विचार करता मी मात्र बाहेरच्या देशाचा व्यक्ती आहे आणि तेथील राजकारणातील प्रवाहाबाबत माझी समज कमी आहे.

राजन हे सध्या ‘शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस’मध्ये शिकवितात. एका सर्वेक्षणात बीओईच्या पदासाठी राजन यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर घेतले जात होते. अर्थात, सेन्ट्रल बँक चालविण्यासाठी तुमच्याशी संपर्क करण्यात आला होता काय? याबाबत राजन यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. बँक ऑफ इंग्लंडच्या प्रमुखपदासाठी फायनान्सियल कंडक्ट ऑथोरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅन्ड्र्यू बेली यांचे नाव आघाडीवर आहे. 

Web Title: Bank of England is not interested in political challenges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.