Azim Premji becomes Asia's largest charity | अझीम प्रेमजी ठरले आशियातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती
अझीम प्रेमजी ठरले आशियातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती

नवी दिल्ली : विप्रो कंपनीचे एके काळचे प्रमुख अझीम प्रेमजी हे आशियातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरले. फोर्ब्ज मासिकाने आशियातील ३0 दानशूर व्यक्तींची यादी प्रकाशित केली असून, त्यात प्रथमच स्थानावर अझीझ प्रेमजी आहेत.
या ३0 दानशूरांच्या यादीत भारतातील किरण मजुमदार-शॉ, त्यांचे पती जॉन शॉ व हेक्सावेअर टेक्नॉलॉजीचे संस्थापक व चेअरमन अतुल निशार यांचीही नावे आहेत. अझीम प्रेमजी सुमारे ५0 वर्षे विप्रोचे कार्यकारी संचालक होते. ते जुलैमध्ये निवृत्त झाले. नंतर त्यांनी आपण दानधर्म व समाजसेवा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी अझीम प्रेमजी फाऊ ंडेशनला ७६0 कोटींचे समभाग देणगीपोटी दिले आहेत. ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षे काम करीत आहे. त्यांनी २१ अब्ज डॉलर्सची संपत्ती देणगीच्या स्वरूपात देण्याचे जाहीर केले आहे.
बायकॉन लिमिटेडच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किरण मजुमदार शॉ व त्यांचे पती जॉन शॉ यांनी युनिव्हर्सिटी आॅफ ग्लासगोला ५३ कोटी ४५ हजार लाखांची देणगी दिली. त्यांनी अन्य संस्थांना दिलेल्या देणग्यांची रक्कम ४0 कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यांनी दिलेल्या देणग्या प्रामुख्याने शैक्षणिक कार्य तसेच कर्करोग उपचार यांसाठी आहेत. अतुल निशार यांनी आतापर्यंत सुमारे ११ कोटी रुपयांची देणगी अवसर अ‍ॅकॅडमी ही मुंबईत मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेला दिली आहे.

लिबाबाचे जॅक मा यांचेही नाव
याखेरीज या यादीत अलीबाबाचे जॅक मा यांचेही नाव आहे. एके काळी स्वत: शिक्षक असलेल्या जॅक मा शिक्षण पद्धतीतील सुधारणा व चीनच्या ग्रामीण भागांत शिक्षणाचा प्रसार यासाठी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या आतापर्यंत दिल्या आहेत.

Web Title: Azim Premji becomes Asia's largest charity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.