Lokmat Money > बिझनेस न्यूज > ॲपल, गुगलला दणका! नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ दशलक्ष डाॅलर्सचा दंड

ॲपल, गुगलला दणका! नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ दशलक्ष डाॅलर्सचा दंड

Apple, Google News: इंटरनेटवर तुमची वैयक्तिक माहिती किती सुरक्षित आहे, हा प्रश्न कायम असताे. माहिती बेकायदेशीररीत्या विकून कंपन्या काेट्यवधी कमावतात. याच मुद्यावरून ॲपल आणि गुगल या कंपन्यांना ११.३ दशलक्ष डाॅलर्सचा दंड ठाेठावण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 08:43 AM2021-11-29T08:43:35+5:302021-11-29T08:44:34+5:30

Apple, Google News: इंटरनेटवर तुमची वैयक्तिक माहिती किती सुरक्षित आहे, हा प्रश्न कायम असताे. माहिती बेकायदेशीररीत्या विकून कंपन्या काेट्यवधी कमावतात. याच मुद्यावरून ॲपल आणि गुगल या कंपन्यांना ११.३ दशलक्ष डाॅलर्सचा दंड ठाेठावण्यात आला आहे.

Apple, Google, 11 million fine for violating rules | ॲपल, गुगलला दणका! नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ दशलक्ष डाॅलर्सचा दंड

ॲपल, गुगलला दणका! नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ दशलक्ष डाॅलर्सचा दंड

राेम : इंटरनेटवर तुमची वैयक्तिक माहिती किती सुरक्षित आहे, हा प्रश्न कायम असताे. माहिती बेकायदेशीररीत्या विकून कंपन्या काेट्यवधी कमावतात. याच मुद्यावरून ॲपल आणि गुगल या कंपन्यांना ११.३ दशलक्ष डाॅलर्सचा दंड ठाेठावण्यात आला आहे. दाेन्ही कंपन्यांनी ग्राहकांची वैयक्तिक माहिती चाेरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
इटलीतील स्पर्धा प्राधिकरणाने दाेन्ही कंपन्यांना हा दंड ठाेठावला आहे. ग्राहकांच्या परवानगीविना त्यांची माहिती व्यावसायिक लाभासाठी या कंपन्यांनी वापरली. कन्झ्युमर काेडचे हे उल्लंघन असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे. प्राधिकरणानुसार ॲपलकडून टूल्स आणि सर्व्हिसेसच्या माध्यमातून युझर्सच्या प्राेफाईलमधील माहितीचा वापर करण्यात येताे. डेटा ट्रान्सफर न करताच उत्पादनाचे प्रमाेशन करण्यात येते. थर्ड पार्टी ॲप स्टाेअर, आयट्यून्स आणि ॲपल बुकच्या माध्यमातून आर्थिक मूल्याचे शाेषण करण्यात येते. गुगलकडून आर्थिक उलाढालीला इंटरनेटशी जाेडण्यात आलेले उत्पादन आणि सेवेच्या अटी आणि शर्तींची माेठी यादी सादर करण्यात येते. इटलीच्या रेग्युलेटरने ॲपल आणि गुगलला दंड ठाेठावण्याची ही दुसरी वेळ आहे. 
यापूर्वी २२५ दशलक्ष डाॅलर्सहून जास्त दंड ठाेठावण्यात आला 
हाेता. 

- स्पर्धा प्राधिकरणाचा निर्णय गुगलला मान्य नाही. त्याविराेधात गुगल याचिका दाखल करणार आहे.  वैयक्तिक माहितीचे व्यवस्थापन आणि त्याच्या वापरासाठी आम्ही युझर्सला कन्ट्राेल देताे, असे गुगलचे म्हणणे आहे.

Web Title: Apple, Google, 11 million fine for violating rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.