Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिल अंबानींनी बिग एफएम विकायला काढली; 1200 कोटींची अपेक्षा

अनिल अंबानींनी बिग एफएम विकायला काढली; 1200 कोटींची अपेक्षा

रिलायंस ब्रॉडकास्ट नेटवर्क (RBN) ही अनिल अंबानींच्या वाट्याला आलेली कंपनी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 11:39 AM2019-05-28T11:39:22+5:302019-05-28T11:42:16+5:30

रिलायंस ब्रॉडकास्ट नेटवर्क (RBN) ही अनिल अंबानींच्या वाट्याला आलेली कंपनी आहे.

Anil Ambani to sell Big FM; Expecting 1200 crores | अनिल अंबानींनी बिग एफएम विकायला काढली; 1200 कोटींची अपेक्षा

अनिल अंबानींनी बिग एफएम विकायला काढली; 1200 कोटींची अपेक्षा

नवी दिल्ली : कर्जाच्या वाढत्या ओझ्याखाली दबलेले रिलायन्स ग्रुपचे अनिल अंबानी यांनी कंपन्या विकायला काढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी म्युचूअल फंडचा व्यवसाय विकला होता. आता त्यांच्या मालकीचा बिग एफएम रेडिओ विकण्याची तयारी सुरु झाली आहे. 1200 कोटी रुपये किंमत येण्याची अपेक्षा अंबानींना आहे. 


रिलायंस ब्रॉडकास्ट नेटवर्क (RBN) ही अनिल अंबानींच्या वाट्याला आलेली कंपनी आहे. ही कंपनी रेडिओ क्षेत्रातील गाजलेले चॅनेल बिग एफएम (Big FM) चालविते. इकॉनॉमिक्स टाईम्सनुसार अंबानी ही कंपनी 1200 कोटी रुपयांना विकणार आहेत. ही कंपनी खरेदी करण्यासाठी जागरण प्रकाशनची एक उप कंपनी म्यूजिक ब्रॉडकॉस्ट लिमिटेड (MBL) इच्छुक आहे. या खरेदीमध्ये एमबीएल (MBL) आधी रिलायंस ब्रॉडकॉस्ट नेटवर्कमध्ये 24 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. 


महत्वाचे म्हणजे जागरण समूहाने आधीच एक म्युझिकशी संबंधीत कंपनी खरेदी केलेली आहे. या समूहाने 2014 मध्ये रेडिओ सिटी हा रेडिओ चॅनेल चालविणारी कंपनी म्यूजिक ब्रॉडकास्ट लिमिटेड खरेदी केली होती. जर जागरण समूहाने बिग एफएम खरेदी केला तर रेडिओ सिटी हा देशातील सर्वात मोठा एफएम चॅनल बनणार आहे. 

 

सध्या बिग एफएमकडे 59 एफएम स्टेशन आहेत. विक्री झाल्यास पहिल्या टप्प्यात रिलायन्स 45 स्टेशन जागरणच्या ताब्यात देणार आहे. या स्टेशनची मुदत गेल्या वर्षीच्या 31 मार्चलाच संपलेली आहे. तर उरलेल्या 14 स्टेशनची मुदत मार्च 2020 मध्ये संपणार आहे. इनफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री अनुसार एक रेडिओ कंपनी नवीन लायसन्स 3 वर्षांपर्यंत विकू शकत नाही. सूत्रांनुसार एका आठवड्यात व्यवहाराची घोषणा होऊ शकते. 

Web Title: Anil Ambani to sell Big FM; Expecting 1200 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.