Lokmat Money > बिझनेस न्यूज > Airtel युझर्सना अखेरची संधी! ५०१ रूपयांपर्यंत स्वस्त मिळतील हे रिचार्ज प्लॅन्स; वर्षभर टेन्शन फ्री

Airtel युझर्सना अखेरची संधी! ५०१ रूपयांपर्यंत स्वस्त मिळतील हे रिचार्ज प्लॅन्स; वर्षभर टेन्शन फ्री

Airtel Prepaid Plans Price Hike : नुकतंच एअरटेलनं आपल्या प्रीपेड प्लॅन्सची किंमत २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 08:21 PM2021-11-23T20:21:15+5:302021-11-23T20:21:33+5:30

Airtel Prepaid Plans Price Hike : नुकतंच एअरटेलनं आपल्या प्रीपेड प्लॅन्सची किंमत २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

airtel prepaid tariff hikes last chance for users get 84 days and 365 days recharge on old price | Airtel युझर्सना अखेरची संधी! ५०१ रूपयांपर्यंत स्वस्त मिळतील हे रिचार्ज प्लॅन्स; वर्षभर टेन्शन फ्री

Airtel युझर्सना अखेरची संधी! ५०१ रूपयांपर्यंत स्वस्त मिळतील हे रिचार्ज प्लॅन्स; वर्षभर टेन्शन फ्री

देशातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी एअरटेलनं आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या (Airtel Prepaid Plans) किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एअरटेलच्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती 25 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्या आहे. या नव्या किंमती 26 नोव्हेंबरपासून लागू होतील. याचाच अर्थ एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांकडे अजूनही काही दिवस शिल्लक असून जुन्या किंमतीत प्रीपेड प्लॅन्स रिचार्ज करता येणार आहे. आम्ही तुम्हाला एअरटेलच्या 84 आणि 365 दिवसांच्या प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी रिचार्चचं टेन्शन राहणार नाही.

कंपनीकडे 84 दिवसांच्या वैधतेसह एकूण तीन अनलिमिटेड प्रीपेड रिचार्ज आहेत. या प्लॅन्सची किंमत 379 रुपये, 598 रुपये आणि 698 रुपये आहे. परंतु 26 नोव्हेंबर नंतर या प्लॅनची ​​किंमत 455 रुपये, रुपये 719 आणि 839 रुपये असेल. 379 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी एकूण 6 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 900 एसएमएस मिळतात. याशिवाय प्राइम व्हिडीओ फ्री ट्रायल, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिक सारख्या अॅप्सचं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.

598 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 126 GB डेटा देण्यात येतो. त्याचप्रमाणे, 698 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना 168 GB डेटा देण्यात येतो. दोन्ही प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS सह येतात. याशिवाय प्राइम व्हिडीओ फ्री ट्रायल, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिकसारख्या अॅप्सचं सबस्क्रिप्शनही देण्यात येत आहे.

365 दिवसांचा सबस्क्रिप्शन प्लॅन
कंपनीकडे वर्षाच्या वैधतेसह दोन प्रीपेड प्लॅन्स आहेत. याची 1498 रुपये आणि 2498 रुपये इतकी आहे. २६ नोव्हेंबरनंतर या प्लॅनची किंमत 1799 रुपये आणि 2999 रुपये होणार आहे. 1498 रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 24 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 3600 एसएमएस देण्यात येतात. तर 2498 रूपयांच्या प्लॅनमध्ये रोज 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देण्यात येतात. या दोन्ही प्लॅनसोबत Prime Video फ्री ट्रायल, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिकसारख्या सुविधा देण्यात येतात.

Web Title: airtel prepaid tariff hikes last chance for users get 84 days and 365 days recharge on old price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.