lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 1 एप्रिलपासून या 9 गोष्टी बदलणार, जाणून घ्या आपल्यावर काय होणार परिणाम

1 एप्रिलपासून या 9 गोष्टी बदलणार, जाणून घ्या आपल्यावर काय होणार परिणाम

तीन दिवसांनंतर आर्थिक वर्षं 2018-19 संपणार असून, नवीन वित्त वर्षाला सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 03:58 PM2019-03-28T15:58:52+5:302019-03-28T16:20:44+5:30

तीन दिवसांनंतर आर्थिक वर्षं 2018-19 संपणार असून, नवीन वित्त वर्षाला सुरुवात होणार आहे.

9 things to change from 1st April, know what will happen to you | 1 एप्रिलपासून या 9 गोष्टी बदलणार, जाणून घ्या आपल्यावर काय होणार परिणाम

1 एप्रिलपासून या 9 गोष्टी बदलणार, जाणून घ्या आपल्यावर काय होणार परिणाम

नवी दिल्ली- तीन दिवसांनंतर आर्थिक वर्षं 2018-19 संपणार असून, नवीन वित्त वर्षाला सुरुवात होणार आहे. यादरम्यान सर्व नियम आणि कायदे बदलणार आहेत. अशातच या बदललेल्या नियमांचा आपल्या जीवनावर काय प्रभाव पडणार आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याचशा गोष्टी सोप्या होणार असल्या तरी काही अडचणीही वाढण्याची शक्यता आहे. 

1. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2019 आहे. जर आपण 31 मार्चपूर्वी आधार कार्ड पॅन कार्डला जोडलं नाही, तर ते निष्क्रिय होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आधार योजनेला संवैधानिक असल्याचं सांगत रिटर्न फाइल आणि पॅन कार्ड जोडणं गरजेचं केलं आहे. 

2. रेल्वे प्रवाशांच्या सेवेतही 1 एप्रिलपासून नवी सुविधा येणार आहे. जर कनेक्टिंग ट्रेन सुटल्यास प्रवाशाला पैसे परत दिले जाणार आहेत. फक्त दोन्ही तिकिटांवरची प्रवाशाची माहिती समान असायला हवी, अशी एक अट आहे. कनेक्टिंग ट्रेननं प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पहिली ट्रेन लेट झाल्यानं दुसरी ट्रेन पकडता येत नाही. अशातच रेल्वे प्रशासन प्रवाशांना तिकिटीचे पैसे परत देणार आहे. 

3. एप्रिलपासून सेबीच्या नियमांमध्येही बदल होणार आहे. नव्या नियमानुसार गुंतवणूकदारांकडून वसूल करण्यात येणारा एकूण कर(टीईआर) 2.25 टक्के राहणार आहे. क्लोज इंडेड स्कीनमध्ये टीईआर 1.25 टक्के असेल, इक्विटी योजनांशिवाय अन्य योजनांसाठी टीईआर एक टक्का असेल. 

4. जर आपले शेअर्स कागदावर आहेत. तर त्यांना डीमॅट अकाऊंटच्या माध्यमातून डिजिटल करवून घेण्याची गरज आहे. 1 एप्रिल 2019पासून डीमॅट खात्यावर असलेले शेअर्स(डिजिटल) वैध समजले जाणार आहेत. 

5. एक एप्रिलनंतर तुमच्याजवळ 125 सीसीहून जास्त पॉवरची मोटारसायकल असल्यास त्यात अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम असणं गरजेचं आहे. त्याशिवाय 125 सीसीमध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम असणं गरजेचं आहे. 

6. एप्रिलपासून विजेचं बिलही प्रीपेड होणार आहेत. आता रिचार्जच्या माध्यमातून विजेचा वापर करता येणार आहे. घरांमध्ये नवे प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहे. 

7. आरपीआयच्या निर्देशानुसार, वेगवेगळ्या कॅटेगरीच्या फ्लोटिंग व्याजदर आता एक्सटर्नल बेंचमार्कला लिंक्ड होणार आहे. 1 एप्रिलपासून हे गरजेचं होणार आहे. त्यानंतर कर्जही स्वस्त होणार आहे. भारतीय स्टेट बँक एसबीआय पहिल्या टप्प्यात हे लागू करणार आहे. 

8. रियल इस्टेट सेक्टरमध्येही नवे जीएसटी दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. नव्या दरानुसार स्वस्त घरांवरील जीएसटी 1 टक्का राहणार आहे. उच्च श्रेणीतल्या घरांवरील जीएसटी 5 टक्के होणार आहे. सध्या ते दर 8 टक्के आणि 12 टक्के आहेत. 

9. ईपीएफओचे नवे नियम लागू झाल्यानंतर फंड ट्रान्सफर करणंही अगदी सोपं होणार आहे. नोकरी बदलल्यानंतर आपलं पीएफ अकाऊंटही ट्रान्सफर करणं सहजशक्य आहे. 

Web Title: 9 things to change from 1st April, know what will happen to you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.