Lokmat Money > बिझनेस न्यूज > 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना DA मध्ये 3 टक्के वाढ होण्यापूर्वी मिळतील 5 फायदे!

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना DA मध्ये 3 टक्के वाढ होण्यापूर्वी मिळतील 5 फायदे!

7th Pay Commission: या सणासुदीच्या काळात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा डीए आणि डीआरच्या दरात 3 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 08:49 AM2021-09-23T08:49:43+5:302021-09-23T08:50:27+5:30

7th Pay Commission: या सणासुदीच्या काळात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा डीए आणि डीआरच्या दरात 3 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे.

7th pay commission latest news 5 benefits before increasing da of government employees | 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना DA मध्ये 3 टक्के वाढ होण्यापूर्वी मिळतील 5 फायदे!

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना DA मध्ये 3 टक्के वाढ होण्यापूर्वी मिळतील 5 फायदे!

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) येत्या काळात एकापाठोपाठ अनेक फायदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये सणासुदीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowances) पुन्हा एकदा 3 टक्क्यांनी वाढ होणार आहे. (7th pay commission latest news 5 benefits before increasing da of government employees)

म्हणजचे, 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत केल्यानंतर आता काही महिन्यांनी पुन्हा वाढ (DA Hike) दिली जाणार आहे. जुलै 2021 मध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की, केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी (Pensioners) महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी घोषणा
या सणासुदीच्या काळात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा डीए आणि डीआरच्या दरात 3 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा डीए आणि डीआर बेसिक वेतनाच्या 28 टक्क्यांवरून 31 टक्के होईल. डीए आणि डीआरमध्ये वाढ करण्याव्यतिरिक्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना इतर काही फायदे देखील मिळतील, ज्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.

सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोणते 5 मोठे फायदे मिळू शकतात. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक पेन्शनची मर्यादा 45000 रुपयांवरून 1.25 लाख रुपये करण्यात आली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आणि त्यांना पुरेशी आर्थिक मदत देण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले होते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोणते मिळणार फायदे?
मोदी सरकारने घरे बांधण्याची इच्छा असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदराने कर्ज देण्यासाठी जून 2020 मध्ये हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स (HBA) सुरू केले होते. याशिवाय, निवृत्त केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांच्या नोंदणीकृत मोबाईल आणि ई-मेलवर थेट एसएमएस, ईमेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे पेन्शन स्लिप देखील सुरू करण्यात आली आहे.

याचबरोबर, डीए आणि डीआर व्यतिरिक्त वाढीव घरभाडे भत्ता (HRA) देखील मिळेल. दरम्यान, डीए 25 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास HRA आपोआप वाढते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव एचआरएचा लाभ मिळू लागला आहे.
 

Read in English

Web Title: 7th pay commission latest news 5 benefits before increasing da of government employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.