7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना डबल फायदा, डीएनंतर आता 'हा' भत्ता वाढविला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 10:40 PM2021-07-27T22:40:13+5:302021-07-27T22:46:49+5:30

7th Pay Commission : केंद्र सरकारने आता घरभाडे भत्ता वाढविला (HRA Hike) आहे. सरकारने 7 जुलै 2021 रोजी हा आदेश मंजूर केला आहे.

7th pay commission government employees double benefit government increases house rent allowance after da hike | 7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना डबल फायदा, डीएनंतर आता 'हा' भत्ता वाढविला

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना डबल फायदा, डीएनंतर आता 'हा' भत्ता वाढविला

Next

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने (Modi Government) बऱ्याच दिवसानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ करून 28 टक्के केला आहे. हे महागाई भत्त्याचे नवीन दर 1 जुलै 2021 पासून लागू होतील. यानंतर केंद्र सरकारने आता घरभाडे भत्ता वाढविला (HRA Hike) आहे. सरकारने 7 जुलै 2021 रोजी हा आदेश मंजूर केला आहे. यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना (Government Employees) दुप्पट फायदा मिळू शकेल. म्हणजेच केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए वाढवण्याबरोबरच सरकारने एचआरएमध्येही बदल केला आहे. (7th pay commission government employees double benefit government increases house rent allowance after da hike)

घरभाडे भत्त्यात बदल का?
7 जुलै रोजी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या ऑर्डरमध्ये असे म्हटले आहे की,  एचआरए वाढविण्यात आला आहे, कारण तो 25 टक्क्यांपर्यंत गेला आहे. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आता केंद्रीय कर्मचार्‍यांना त्यांच्या शहरानुसार 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के दराने एचआरए मिळेल. शहरांची एक्स, वाय व झेड क्लासमध्ये (Class of City) विभागणी करण्यात आली आहे. पूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांना 24 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के एचआरए मिळत होता.

काही कर्मचाऱ्यांनी आदेश लागू होणार नाही
सरकारी कर्मचार्‍यांना महागाई भत्ता (डीए) 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आदेश 1 जुलैपासून लागू होणार आहे. हा आदेश रेल्वे कर्मचारी आणि लष्कराच्या जवानांना लागू होणार नाही, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. यासाठी रेल्वे मंत्रालय व संरक्षण मंत्रालयाकडून स्वतंत्र आदेश दिले जातील. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. या दरवाढीमध्ये शेवटच्या तीन अतिरिक्त हप्त्यांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या वर्षाच्या सुरूवातीपासून ते यावर्षी 30 जूनपर्यंत हा 17 टक्के राहील.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 7th pay commission government employees double benefit government increases house rent allowance after da hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app