Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2023: ७.५ लाखांचे उत्पन्न करमुक्त, नव्या कर रचनेबाबत सीबीडीटीचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी संभ्रम केला दूर

Budget 2023: ७.५ लाखांचे उत्पन्न करमुक्त, नव्या कर रचनेबाबत सीबीडीटीचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी संभ्रम केला दूर

income tax : नव्या प्रस्तावित कर रचनेत आता ५० हजार रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे प्रभावीपणे ७.५० लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 06:52 AM2023-02-04T06:52:05+5:302023-02-04T06:53:41+5:30

income tax : नव्या प्रस्तावित कर रचनेत आता ५० हजार रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे प्रभावीपणे ७.५० लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही.

7.5 lakh income tax free, CBDT president Nitin Gupta clears confusion regarding new tax structure | Budget 2023: ७.५ लाखांचे उत्पन्न करमुक्त, नव्या कर रचनेबाबत सीबीडीटीचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी संभ्रम केला दूर

Budget 2023: ७.५ लाखांचे उत्पन्न करमुक्त, नव्या कर रचनेबाबत सीबीडीटीचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी संभ्रम केला दूर

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नव्या प्रस्तावित कर रचनेत आता ५० हजार रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे प्रभावीपणे ७.५० लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. त्यामुळे नव्या आयकर रचनेत आयकर विवरणपत्र दाखल करणे हे अधिक रोचक झाले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय थेट कर बोर्डाचे चेअरमन नितीन गुप्ता यांनी केले आहे.

यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले होते की, ‘नवीन आयकर पद्धती आणखी आकर्षक करण्यात आली आहे.’ या पार्श्वभूमीवर नितीन गुप्ता यांनीही नवीन आयकर पद्धतीची भलामन केली आहे. गुप्ता यांनी एका मुलाखतीत सांगितले की, नव्या आयकर पद्धतीत नवीन स्लॅब आणि दर जाहीर करण्यात आली आहे. त्यामागे सर्व वजावटी व सवलती हळूहळू रद्द करण्याचा उद्देश आहे. वजावटी व सवलती पूर्ण संपल्यानंतर कर कपात करण्याची दीर्घकालीन मागणी मान्य करता येऊ शकेल.  नवीन कर पद्धती आता सर्वांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल.

नव्या रचनेत ५० हजार रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा करदात्यांना लाभ मिळणार
७ लाख रुपयांपेक्षा जास्त वेतन असेल तर ५० हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ नाेकरदार वर्गाला घेता येणार आहे. मध्यमवर्गीय नाेकरदार वर्गाला जुन्या आणि नव्या कर रचनांमधून निवड करण्याचा पर्याय आहे इतर टप्प्यांसाठीही हीच तरतूद आहे. तर ५ काेटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वर्गासाठी अधिभार आता २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे या वर्गालाही फायदा आहे, असे नितीन गुप्ता यांनी सांगितले.

३ कोटी नोकरदारांची जुन्याच रचनेला पसंती
देशात ३.५ कोटी नोकरदार आहेत. ते जुन्याच कर पद्धतीचा अवलंब करीत होते. स्थायी वजावटीचा लाभ नव्या पद्धतीतही आता देण्यात आल्यामुळे त्यांना नव्या पद्धतीतही लाभ मिळेल. 
जुनी कर रचना अबाधित
जुनी कर रचना जशीच्या तशी आहे. आम्ही नव्या रचनेत बदल केले आहेत. नवी रचना सर्वांसाठीच फायदेशीर आहे. ३-७ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कर भरावा लागणार नाही. या गटासाठी २५ हजार रुपयांच्या कराचा बाेजा सरकार सहन करेल, असे नितीन गुप्ता यांनी स्पष्ट केले. 
सरकारला हवी वजावटरहित कर रचना 
सरकारने नवी कर रचना बंधनकारक करण्याबाबत काेणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. मात्र, नाेकरदार वर्गाने काेणत्याही गुंतवणुकीवर वजावटरहित कर रचना स्वीकारावी, हे सरकारचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती महसूल सचिव संजय मल्हाेत्रा यांनी दिली आहे.

१५ लाख रुपये उत्पन्न असल्यास...
१५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना जुन्या व्यवस्थेतील लाभ मिळविण्यासाठी कमीत कमी ३.७५ लाख रुपयांची वजावट घ्यावी लागेल. तसे नसल्यास त्यांना नवी रचनाच जास्त फायदेशीर ठरणार आहे.

१० लाख रुपये उत्पन्न असल्यास...
१० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्यास जुन्या रचनेनुसार किमान २.६२ लाख रुपयांच्या वजावटीचा दावा करावा लागेल. तरच, जुनी वजावट लाभदायक आहे. तसे नसल्यास नवी रचना जास्त फायदेशीर ठरेल, असे महसूल विभागाचे विश्लेषण सांगते.

Web Title: 7.5 lakh income tax free, CBDT president Nitin Gupta clears confusion regarding new tax structure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.