Lokmat Money > बिझनेस न्यूज > धान्य, डाळींसह शेतमालावर आता ५ टक्के GST; व्यापारी आक्रमक, ग्राहकांना मोठा फटका

धान्य, डाळींसह शेतमालावर आता ५ टक्के GST; व्यापारी आक्रमक, ग्राहकांना मोठा फटका

ब्रॅण्डेड नसलेल्या धान्यालाही कराच्या जाळ्यात ओढण्यात आल आहे. पोत्यात पॅकिंग करुन लेबलसह विकले जाणारे प्रत्येक धान्य आता ५ टक्के जीएसटीला पात्र राहील.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 10:21 AM2022-07-06T10:21:11+5:302022-07-06T10:21:22+5:30

ब्रॅण्डेड नसलेल्या धान्यालाही कराच्या जाळ्यात ओढण्यात आल आहे. पोत्यात पॅकिंग करुन लेबलसह विकले जाणारे प्रत्येक धान्य आता ५ टक्के जीएसटीला पात्र राहील.

5 per cent GST on agricultural commodities including grains and pulses; Merchant aggressive, big blow to customers | धान्य, डाळींसह शेतमालावर आता ५ टक्के GST; व्यापारी आक्रमक, ग्राहकांना मोठा फटका

धान्य, डाळींसह शेतमालावर आता ५ टक्के GST; व्यापारी आक्रमक, ग्राहकांना मोठा फटका

सांगली : अधिकाधिक व्यावसायिकांना कराच्या जाळ्यात पकडण्याच्या प्रयत्नात जीएसटी परिषदेने थेट शेतमालावरही कर लागू केला आहे. धान्य, डाळी आणि अन्य शेतमालावर ५ टक्के जीएसटी लावला असून १८ जुलैपासून अंमलबजावणी होणार आहे. याविरोधात व्यापारी आक्रमक झाले आहेत. चेंबर ऑफ कॉमर्सने शुक्रवारी (दि. ८) पुण्यात तातडीची बैठक बोलावली आहे.

ब्रॅण्डेड नसलेल्या धान्यालाही कराच्या जाळ्यात ओढण्यात आल आहे. पोत्यात पॅकिंग करुन लेबलसह विकले जाणारे प्रत्येक धान्य आता ५ टक्के जीएसटीला पात्र राहील. शेतकऱ्याने बाजारात आणलेले धान्य करमुक्त असेल, पण त्याला लेबल लावून विक्री करताना मात्र ५ टक्के जीएसटी भरावा लागेल. सर्वसामान्यांच्या ताटातील दररोजचे अन्न असलेली ज्वारी, तांदूळ, गहू, कडधान्ये, डाळी कराच्या जाळ्यात आल्या आहेत.

कशी वाढेल महागाई?
गव्हाचे ५० किलोचे पोते सध्या १५०० रुपयांना मिळत असेल, तर जादा ७५ रुपये मोजावे लागतील. १४० रुपये किलोची तूरडाळ १४७ रुपयांना, तर १०० रुपयांची मसूरडाळ १०५ रुपयांना घ्यावी लागेल. पॅकिंग करुन विकली जाणारी ज्वारी महागणार.

नव्या कररचनेमुळे व्यापारी संतप्त आहेत. चेंबर ऑफ कॉमर्सने यावर विचार करण्यासाठी बैठक बोलावली आहे. नव्या कररचनेमुळे महागाई वाढणार आहे. याचा फेरचिवार करणे आवश्यक आहे.    - प्रशांत पाटील,  सचिव चेंबर ऑफ कॉमर्स, सांगली.

Read in English

Web Title: 5 per cent GST on agricultural commodities including grains and pulses; Merchant aggressive, big blow to customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.