Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयुर्विमाधारकांच्या संख्येत ४४ टक्के घट; कोरोनामुळे सध्या आरोग्य विम्याला प्राधान्य

आयुर्विमाधारकांच्या संख्येत ४४ टक्के घट; कोरोनामुळे सध्या आरोग्य विम्याला प्राधान्य

इन्श्युरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडे (आयआरडीएआय) देशातील विमा व्यवसायाबाबतची माहिती संकलित केली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 02:36 AM2020-10-11T02:36:20+5:302020-10-11T02:36:35+5:30

इन्श्युरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडे (आयआरडीएआय) देशातील विमा व्यवसायाबाबतची माहिती संकलित केली जाते.

44% reduction in the number of life insurers; Corona currently prefers health insurance | आयुर्विमाधारकांच्या संख्येत ४४ टक्के घट; कोरोनामुळे सध्या आरोग्य विम्याला प्राधान्य

आयुर्विमाधारकांच्या संख्येत ४४ टक्के घट; कोरोनामुळे सध्या आरोग्य विम्याला प्राधान्य

मुंबई : २०१९-२० या आर्थिक वर्षांतील एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहामाहीत देशातील ९ कोटी ८७ लाख लोकांनी आयुर्विम्याचे संरक्षण घेतले होते. मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षात सप्टेंबर अखेरपर्यंत ती संख्या तब्बल ५ कोटी ४४ लाखांपर्यंत कमी झाल्याची माहिती हाती आली आहे.

इन्श्युरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडे (आयआरडीएआय) देशातील विमा व्यवसायाबाबतची माहिती संकलित केली जाते. तिथल्या नोंदींच्या आधारे ही माहिती हाती आली आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत एलआयसीसह खासगी विमा कंपन्यांकडे १ कोटी १६ हजार पॉलिसी काढण्यात आल्या होत्या. यंदा ती संख्या २२ टक्क्यांनी कमी म्हणजे ९० लाख ८५ हजार आहे. पहिल्या वर्षीच्या प्रीमियमपोटी यंदा विमा कंपन्यांच्या तिजोरीत १ लाख २५ हजार कोटी जमा झाले. गेल्या वर्षी हा आकडा १ लाख २४ हजार कोटी होता. विम्याचे संरक्षण घेणाऱ्यांसाठी सम अ‍ॅश्युअर्डची रक्कम गेल्या वर्षी २१ लाख ६४ हजार कोटी होती. ती यंदा २० लाख १ हजार कोटींवर आली. कोरोना संकटामुळे आयुर्विमा काढण्यापेक्षा सध्या आरोग्य विम्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे हा विमा काढणाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याचे विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

७० टक्के वाटा एलआयसीचा
भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ही सरकारी आणि अन्य २३ खासगी कंपन्या या विमा क्षेत्रात कार्यरत आहेत. एलआयसीकडे एकूण व्यवहाराच्या ७०.५७ टक्के, तर खासगी कंपन्यांचा वाटा २९.४३ टक्के आहे. गेल्या काही महिन्यांत खासगी कंपन्यांचा वाटा वाढत असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येते.

 

Web Title: 44% reduction in the number of life insurers; Corona currently prefers health insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.