Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'PM-WANI Wi-Fi' योजनेतून २ कोटी रोजगार अन् स्वस्तात 'कनेक्टिव्हिटी'

'PM-WANI Wi-Fi' योजनेतून २ कोटी रोजगार अन् स्वस्तात 'कनेक्टिव्हिटी'

देशात सर्वत्र सार्वजनिक पद्धतीने WiFi उपलब्ध करुन देण्याच्या योजनेच्या व्यवहार्यतेवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवरही टीव्ही रामचंद्रन यांनी उत्तर दिलं.

By मोरेश्वर येरम | Published: December 17, 2020 08:32 PM2020-12-17T20:32:23+5:302020-12-17T20:47:50+5:30

देशात सर्वत्र सार्वजनिक पद्धतीने WiFi उपलब्ध करुन देण्याच्या योजनेच्या व्यवहार्यतेवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवरही टीव्ही रामचंद्रन यांनी उत्तर दिलं.

2 crore jobs and affordable connectivity through 'PM-WANI Wi-Fi' scheme | 'PM-WANI Wi-Fi' योजनेतून २ कोटी रोजगार अन् स्वस्तात 'कनेक्टिव्हिटी'

'PM-WANI Wi-Fi' योजनेतून २ कोटी रोजगार अन् स्वस्तात 'कनेक्टिव्हिटी'

Highlightsपंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी PM WANI WiFi योजनेतून रोजगार निर्मितीचा दावादेशात वाय-फाय क्रांती घडवून आणली जाईल असा केंद्राचा दावादेशात सरकार १ कोटी डेटा सेंटर उघडणार

नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी PM-WANI WiFi योजनेतून देशात २ कोटी रोजगार निर्मिती होईल, असा दावा भारतीय प्रसारण मंचाचे अध्यक्ष टीव्ही रामचंद्रन यांनी केला आहे. याशिवाय, स्वस्तात कनेक्टिव्हिटी उपलब्ध करुन देण्याच्या क्षेत्रात उद्योजकतेची संधी देखील निर्माण होईल, असंही ते म्हणाले. 

देशात सर्वत्र सार्वजनिक पद्धतीने WiFi उपलब्ध करुन देण्याच्या योजनेच्या व्यवहार्यतेवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवरही त्यांनी उत्तर दिलं. गेल्या काही वर्षात सरकारने अनेक ठिकाणी सार्वजनिक स्तरावर WiFi आणि डेटा सेंटर्स उभारल्याचे प्रकप्ल यशस्वीरित्या राबवले आहेत, असं रामचंद्रन म्हणाले. 

मोबाइल डेटाच्या किमतीत गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी येत्या काही वर्षात मोबाइल डेटाच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. पण  WiFi हॉटस्पॉट्स हे सामान्य माणसासाठी स्वस्तात डेटा उपलब्ध करुन देणारं माध्यम आहे. त्यामुळे मोठ्या पातळीवर याची अंमलबजावणी केल्यास सर्वसामान्यांसाठी परवडणारी इंटरनेट कनेक्टीव्हिटी उपलब्ध करुन देता येईल, असं रामचंद्रन म्हणाले.   

PM Wi-Fi योजनेला मंजुरी, १ कोटी डेटा सेंटर उघडणार; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

केंद्र सरकारने ९ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मोठी घोषणा केली होती. देशात सरकार १ कोटी डेटा सेंटर उघडणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. या योजनेला PM WANI WiFi असं नाव देण्यात आलं आहे. ज्याद्वारे देशात वाय-फाय क्रांती घडवून आणली जाईल, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी जाहीर केले होते. 

इंटरनेटचा वाढता उपभोग आणि वाढते सबस्क्राइबर्स लक्षात घेता संपूर्ण देशात स्थिर, वेगवान इंटरनेट सेवा देण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य आहे. यासोबतच ज्या ठिकाणी अद्याप ४ जी नेटवर्क देखील पोहोचू शकलेलं नाही अशा ठिकाणीही इंटनेटचा वेग वाढवण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. यासााठी सार्वजनिक पातळीवरील मोफत WiFi निर्मितीच्या या  प्रकल्पातून नक्कीच फायदा होईल, असंही रामचंद्रन म्हणाले.

Read in English

Web Title: 2 crore jobs and affordable connectivity through 'PM-WANI Wi-Fi' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.