Lokmat Money > बिझनेस न्यूज > 19 लाख शेतकऱ्यांनी घेतला 3 हजार रुपये प्रतिमहिना पेन्शन योजनेचा फायदा, असा करा अर्ज...

19 लाख शेतकऱ्यांनी घेतला 3 हजार रुपये प्रतिमहिना पेन्शन योजनेचा फायदा, असा करा अर्ज...

केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान पेन्शन योजनेचा आतापर्यंत 19.20 लाख शेतक-यांनी लाभ घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 11:42 AM2020-01-19T11:42:29+5:302020-01-19T11:50:11+5:30

केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान पेन्शन योजनेचा आतापर्यंत 19.20 लाख शेतक-यांनी लाभ घेतला आहे.

19 lakh farmers have taken benefit of Rs 3,000 per month pension scheme | 19 लाख शेतकऱ्यांनी घेतला 3 हजार रुपये प्रतिमहिना पेन्शन योजनेचा फायदा, असा करा अर्ज...

19 लाख शेतकऱ्यांनी घेतला 3 हजार रुपये प्रतिमहिना पेन्शन योजनेचा फायदा, असा करा अर्ज...

Highlightsकेंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान पेन्शन योजनेचा आतापर्यंत 19.20 लाख शेतक-यांनी लाभ घेतला पंतप्रधान किसान पेन्शन योजनेंतर्गत 5 कोटी शेतकऱ्यांना 3 हजार रुपये प्रतिमहिना पेन्शनच्या स्वरूपात दिले जात आहेत. या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला 50 टक्के रक्कम मिळते.

नवी दिल्लीः केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान पेन्शन योजनेचा आतापर्यंत 19.20 लाख शेतक-यांनी लाभ घेतला आहे. पंतप्रधान किसान पेन्शन योजनेंतर्गत 5 कोटी शेतकऱ्यांना 3 हजार रुपये प्रतिमहिना पेन्शनच्या स्वरूपात दिले जात आहेत. या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला 50 टक्के रक्कम मिळते. अशातच तुम्हीसुद्धा शेतकरी आहात आणि केंद्राच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास घरबसल्या ऑनलाइन पद्धतीनं नोंदणी करता येते. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत लिखित उत्तराद्वारे सांगितलं की, या योजनेत छोट्या आणि मर्यादित शेतकऱ्यांना वयोवृद्धात सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासंबंधी माहिती दिलेली आहे. 

LICमार्फतही मिळवू शकता पेन्शनची सुविधा
या योजनेंतर्गत शेतकऱ्याचं वयवर्षं 60 झाल्यानंतर प्रतिमहिना कमीत कमी 3 हजार रुपये पेन्शन दिली जाते. पण जर लाभार्थी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यातील 50 टक्के रक्कम त्याच्या कुटुंबीयांना दिली जाते. या पेन्शन निधीचं नियोजन भारतीय जीवन विमा निगम (Life Insurance Corporation of India) करते. या योजनेत कशी कराल नोंदणी- पंतप्रधान किसान पेन्शन योजनेत आपण शेतकरी कॉल सेंटर नंबर 1800-180-1551वर कॉल करून माहिती घेऊ शकता. तसेच सामान्य सेवा केंद्र अधिकारी (सीएससी) आणि राज्य नोडल अधिकाऱ्याशीसुद्धा संपर्क साधू शकता. या नोंदणीसाठी शेतकऱ्याला फक्त आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागणार आहे. नोंदणीदरम्यान शेतकऱ्याचं पेन्शन युनिक नंबर आणि पेन्शन कार्ड तयार केलं जाणार आहे. 

पती-पत्नीलाही मिळू शकते पेन्शन
मोदी सरकारच्या योजनेचा लाभ पती-पत्नी वेगवेगळ्या पद्धतीनं मिळवू शकतात. 3 हजार रुपये पेन्शन मिळवण्याचा दोघांनाही हक्क आहे. 60 वर्षं पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास पत्नी ही योजना पुढे सुरू ठेवू शकते. पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीला मासिक पेन्शन 50 टक्के म्हणजेच 1500 रुपये मिळणार आहे. 

5 वर्षांनंतर या योजनेतून बाहेर पडण्याची मुभा
या योजनेत पाच वर्षं लागोपाठ योगदान दिल्यानंतर शेतकरी स्वतःच्या मर्जीनं बाहेर पडू शकतो. या योजनेत गुंतवलेली रक्कम एलआयसीच्या माध्यमातून बँकांच्या व्याजदरानं परत मिळते. 
 

Web Title: 19 lakh farmers have taken benefit of Rs 3,000 per month pension scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी