Lokmat Money > बिझनेस न्यूज > १९७९ मध्ये सेन्सेक्समध्ये १ लाख गुंतविले असते, तर आज मिळाले असते ३.९ कोटी

१९७९ मध्ये सेन्सेक्समध्ये १ लाख गुंतविले असते, तर आज मिळाले असते ३.९ कोटी

१९८५ मध्ये बीएसईने सेन्सेक्सचे आकडे जाहीर करायला सुरुवात केली, तेव्हा सेन्सेक्स ४00 अंकांवर होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 08:06 AM2019-04-03T08:06:59+5:302019-04-03T08:07:05+5:30

१९८५ मध्ये बीएसईने सेन्सेक्सचे आकडे जाहीर करायला सुरुवात केली, तेव्हा सेन्सेक्स ४00 अंकांवर होता.

In 1 9 7 9, the Sensex would have invested one lakh, today it will get 3.9 crore | १९७९ मध्ये सेन्सेक्समध्ये १ लाख गुंतविले असते, तर आज मिळाले असते ३.९ कोटी

१९७९ मध्ये सेन्सेक्समध्ये १ लाख गुंतविले असते, तर आज मिळाले असते ३.९ कोटी

मुंबई : सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्सने ३९ हजार अंकांचा टप्पा प्रथमच ओलांडला. ४0 वर्षांपूर्वी १ एप्रिल १९७९ रोजी सेन्सेक्सचा तांत्रिकदृष्ट्या जन्म झाला होता. तेव्हा सेन्सेक्सचे आधार मूल्य १00 अंकांचे होते. गेल्या ४0 वर्षांत तो ३९0 पट वाढला आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास १ एप्रिल १९७९ रोजी एखाद्या व्यक्तीने सेन्सेक्समध्ये १ लाख रुपये गुंतविले असते, तर ते आज त्याचे ३.९ कोटी रुपये झाले असते.

१९८५ मध्ये बीएसईने सेन्सेक्सचे आकडे जाहीर करायला सुरुवात केली, तेव्हा सेन्सेक्स ४00 अंकांवर होता. त्याच वर्षी सेन्सेक्सने सर्वाधिक ९४ टक्के वार्षिक परतावा दिला. २00८ मध्ये तो अर्ध्यापेक्षा जास्त घसरून २0 हजार अंकांवरून ९,६00 अंकांवर आला.

च्सोमवारी सेन्सेक्स २00 अंकांच्या वाढीसह उघडला आणि नंतर उसळून ३९,११६ अंकांवर गेला. हा सेन्सेक्सचा सार्वकालिक उच्चांक होता. सत्राच्या शेवटी तो १९९ अंकांच्या वाढीसह ३८,८७२ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स सातत्याने खाली वर होत आला आहे. तथापि, दीर्घकालीन पातळीवर त्याने जबरदस्त परतावा दिला आहे. पराग पारीख लाँग टर्म इक्विटी फंड या संस्थेचे फंड मॅनेजर राजीव ठक्कर यांनी सांगितले की, जे लोक अस्थैर्याला घाबरून प्रवासात टिकून राहत नाहीत, ते लाभापासून वंचित राहतात. गुंतवणूकदारांनी समभागांच्या किमतींकडे सातत्याने पाहत राहणे योग्य नाही.

च्गेल्या ४0 वर्षांच्या काळात भारतीय बाजाराने असंख्य आघात आणि धक्के पचवले आहेत. एका पंतप्रधानाची आणि एका माजी पंतप्रधानाची हत्या, अणुबॉम्बच्या चाचण्या, दोन मोठे शेअर घोटाळे, एक युद्ध व पाकिस्तानी सीमेवरील असंख्य चकमकी, ९/११ आणि २६/११ चे अतिरेकी हल्ले, विदेशी कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी सोने गहाण ठेवण्याची नामुष्की आणि केंद्रातील सरकारांचे पतन अशा घटनांचा त्यात समावेश आहे, असे असतानाही गेल्या ४0 वर्षांतील शेअर बाजाराचा वार्षिक सरासरी परतावा १६ टक्क्यांपेक्षाही जास्त राहिला आहे. बँकांतील ठेवींचा परतावा ७ टक्के आणि सोन्याचा ९% आहे.

च्एटिका वेल्थ
मॅनेजमेंटचे एमडी व सीईओ गजेंद्र कोठारी यांनी सांगितले की, कंपन्यांच्या समभागांची काहीच माहिती नसलेल्या गुंतवणूकदारांनी जर थेट सेन्सेक्समध्ये गुंतवणूक केली असती, तरी त्यांची संपत्ती कित्येक पटीने वाढली असती.

Web Title: In 1 9 7 9, the Sensex would have invested one lakh, today it will get 3.9 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.