भरधाव ट्रकच्या धडकेतदुचाकीस्वार युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 11:28 AM2020-10-14T11:28:22+5:302020-10-14T11:28:33+5:30

Malkapur Accident News विवरा येथील प्रमोद सुधाकर कडू हा ३५ वर्षीय तरुण जागीच ठार झाला.

Youth killed in truck collision | भरधाव ट्रकच्या धडकेतदुचाकीस्वार युवक ठार

भरधाव ट्रकच्या धडकेतदुचाकीस्वार युवक ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मलकापूर : भरधाव वेगात विरूध्द बाजूने जात असलेल्या ट्रकच्या धडकेत विवरा येथील प्रमोद सुधाकर कडू हा ३५ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना १३ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२:३० वाजता  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील दसरखेड परिसरातील हॉटेलसमोर घडली.                   मृतक तरुण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील चिखली (रणथम) येथील आठवडी बाजारातून भाजीपाला घेऊन एमएच २८ एस-४११९ क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे जात होता. दरम्यान मुक्ताई नगरकडे भरधाव वेगाने चूकीच्या बाजूने असलेल्या सिजी-०४ एलआर-८७२७ या ट्रकने दूचाकीस धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार प्रमोद कडू जागीच ठार झाला.
      दसरखेडचे सरपंच संतोष साठे यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.  तसेच हॉटेलच्या परीसरात शोध घेतला ट्रक आढळुन आला. चालक मात्र फरार झाला आहे.

Web Title: Youth killed in truck collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.