बुस्टरपंप जळाल्याने खामगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 12:09 PM2021-02-04T12:09:35+5:302021-02-04T12:09:41+5:30

Water supply of Khamgaon city गत तीन दिवसांपासून खामगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. 

Water supply of Khamgaon city disrupted due to burning of booster pump | बुस्टरपंप जळाल्याने खामगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

बुस्टरपंप जळाल्याने खामगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वामननगरातील टाकीवरील बूस्टरपंप सोमवारी जळाला. त्यामुळे गत तीन दिवसांपासून खामगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. 
वाढीव पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा कायम असतानाच, दुसरीकडे कार्यान्वित असलेली योजनाही कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते.
खामगाव शहरातील पाणीसमस्या सोडविण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम गत ११ वर्षांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. 
गत साडेचार वर्षांच्या कालावधीत या योजनेला गती देण्यासाठी, तसेच पूर्णत्वास नेण्यासाठी पालिका प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत, तर काही ठिकाणी जुन्या पाइपलाइनवरच वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत नळांची जोडणी केली आहे.
 परिणामी, शहरात कार्यान्वित असलेल्या पाणीपुरवठा योजनेवरील ताण वाढला आहे.

पाणीपुरवठा पुन्हा लांबणीवर!
वामननगरात टाकीवरील बूस्टरपंप जळाल्याने हिरानगर, तलाव रोड, चांदमारी, शेगावनाका, लक्ष्मी बाग परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. पाणीवाटपाचे रोटेशन बिघडल्याने नागरिकांना आता ११व्या दिवशीपर्यंत पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतात मुबलक साठा असतानाही, नगरपालिका प्रशासन नियमित पाणी वितरण करण्यास कुठेतरी कमी पडत असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Water supply of Khamgaon city disrupted due to burning of booster pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.