ग्रामसेवकांचा बेमुदत असहकार आंदोलनाचा इशारा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 07:13 PM2021-04-15T19:13:08+5:302021-04-15T19:13:24+5:30

Non-cooperation movement of Gram Sevaks : बेमुदत असहकार आंदोलन दिनांक ३.५.२०२१ ला करण्यासाठी ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून इशारा दिला जात आहे.

Warning of indefinite non-cooperation movement of Gram Sevaks | ग्रामसेवकांचा बेमुदत असहकार आंदोलनाचा इशारा  

ग्रामसेवकांचा बेमुदत असहकार आंदोलनाचा इशारा  

Next

नांदुरा :  ग्रामसेवक कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने बेमुदत असहकार आंदोलन दिनांक ३.५.२०२१ ला करण्यासाठी ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून इशारा दिला जात आहे.  ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्या सेवाविषयक प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्रलंबित आहेत यासाठी यापूर्वी पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला आहे समक्ष खाते प्रमुख अधिकारी यांच्यासोबत बरेच वेळा चर्चा सुद्धा करण्यात आल्या आहेत प्रत्येक वेळी प्रश्न सोडविण्याचे फक्त आश्वासने प्रशासनाकडून देण्यात आले आहे असेही ग्रामसेवक संघटनेच्या वतीने बोलल्या जात आहे. प्रश्न प्रलंबित राहिले आहेत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. याबाबत अनेक ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करून प्रशासना विरोधात बेमुदत असहकार आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कोविड १९ चे प्रशासनाचे निर्बंध हटल्यावर म्हणजे दिनांक ३ मे २०२१ पासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी बेमुदत असहकार आंदोलनात सहभागी होणार आहेत. आंदोलन काळात ग्रामपंचायतीचे सर्व कामे सुरळीत सुरू राहतील असेही पत्रात नमूद केले आहे. जनतेची कोणतेही प्रकारचे कामे थांबवली जाणार नाही, परंतु जिल्हा परिषद प्रशासनासोबत असहकार कायम राहील. सर्व प्रकारच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात येईल. कोणत्याही अधिकाऱ्यांना दप्तर दाखविला जाणार नाही, असा इशारही पत्रकाद्वारे दिला आहे खालील प्रमाणे आहेत.

प्रलंबित मागण्या 

  १) ग्राम विकास अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत कृषी यांचे पदोन्नती आदेश निर्गमित करणे २) कालबद्ध पदोन्नती १०,२०,३०, वर्ष प्रकरने निकाली काढणे बाबत ३) ग्रामसेवकाचे भविष्य निर्वाह निधीचे हिशोब मिळणेबाबत ४) ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना स्थापितव प्रमाणपत्र मिळणेबाबत ५) मराठी भाषा हिंदी भाषा सूट मिळणेबाबत ६) सुरक्षा ठेव अनामत रुपये दहा हजार परत मिळणे बाबत ७) निलंबित ग्रामसेवक सेवेत सामावून घेणे बाबत ८) आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण करणे ९ ) आंतरजिल्हा बदलीचे प्रकरण निकाली काढण्याबाबत १० ) सन 2016 पासून ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना सी आर च्या झेरॉक्स प्रती उपलब्ध करून देण्याबाबत ११) जिल्हा परिषद पंचायत विभागातील सर्व ग्रामसेवक यांच्या बदल्या नियमानुसार ईरक्त करण्यात यावे १२ ) अतिरिक्त मेहनतना ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात यावा १३) प्रलंबित वैद्यकीय बिल अदा करण्यात यावी या सर्व ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी बेमुदत असहकार आंदोलनाचा इशारा दिला आहे .

Web Title: Warning of indefinite non-cooperation movement of Gram Sevaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.