शेगाव शहरासह तालुक्यातील लसीकरण केंद्रावर व्हीआयपींच्या मर्जीतल्यांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 12:26 PM2021-05-07T12:26:59+5:302021-05-07T12:29:11+5:30

Buldhana News : अनेकांना लस। न घेता जावे लागले परत.

VIPs control the vaccination center in the taluka including Shegaon city | शेगाव शहरासह तालुक्यातील लसीकरण केंद्रावर व्हीआयपींच्या मर्जीतल्यांचा ताबा

शेगाव शहरासह तालुक्यातील लसीकरण केंद्रावर व्हीआयपींच्या मर्जीतल्यांचा ताबा

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क
शेगाव  : शहरासह तालुक्यातील कोविड लसीकरण केंद्रावर व्हीआयपी व त्यांच्या मर्जीतल्या लोकांचा ताबा असून नाव नोंदवून बुकींग असलेल्या नागरिकांना लसकरणाविना परत जावे लागते.तर शहरातील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रूग्णालय व जुन्या शहरातील नगर परिषद रुग्णालयाच्या केंद्रावर एकच गोंधळ उडाला. 
शहरातील दोन्ही लसीकरण केंद्रावर व्हीआयपी व त्यांच्या मराठीतील हीतचिंतकांची लस घेण्यासाठी गर्दी होत आहे,येथे आल्यानंतर त्यांची ऑनलाईन नोंदणी  व बुकींग  वेळेवर केल्या जाते.त्यामुळे सकाळ पासून नियमानुसार बुकींग केलेल्या नागरिकांना लस न घेता मनस्ताप सहन करत परत जावे लागते.व्हीआयपींच्या प्राधान्यामुळे सर्वसामान्यांना नाहक हेलपाटे पडत आहेत.
दुसर्या डोससाठी नंबर लागल्यावरही लाभधारकाला लस न देता व्हीआयपी च्या समर्थकांना ती लस दिल्या जाते,याप्रकाराने शहर व ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर गोंधळ निर्माण होत आहे. 
सर्वसामान्य नागरिकांना सकाळपासून रखरखत्या उन्हात रांगेत ताटकळत उभे राहावे लागते.
ग्रामीण भागातील केंद्रावरही शहरातील व्हीआयपी लस घेण्यासाठी येत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील  केंद्रावर सुध्दा गोंधळ होत आहे. 
तरी वरिष्ठांना दखल घेवून लसीकरण केंद्रावर होत असलेल्या गोंधळाला प्रतिबंध करावा व नियमानुसार नोंदणी केलेल्यांनाच लसीकरण करण्याची मागणी होत आहे. 

# जिल्हाधिकार्यांशी भ्रमणध्वनीवर चर्चा.....
वैद्यकीय अधिक्षक डाॅ प्रेमचंद पंडीत यांच्याशी शिवसेना नगरसेवक दिनेश शिंदे यांनी लसीकरण केंद्रावर गोंधळाबाबत चर्चा केली.तसेच  जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ सांगळे यांचेशी सुध्दा भ्रमणध्वनीवर चर्चा केली.

नागरिकांनी गर्दी करू नये.
नोंदणीनुसार बुकींग असलेल्या नागरिकांनी वेळेवर येवून लसीकरण करून घ्यावे तसेच लग्गेबाजीला प्रतिबंध करावा,लसीकरणासाठी प्रत्येकानी सहकार्य करावे.
- डाॅ प्रेमचंद पंडीत 
वैद्यकीय अधिक्षक 
सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रूग्णालय,शेगाव

Web Title: VIPs control the vaccination center in the taluka including Shegaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.