धानोरा गांवावर शोककळा; दोन भाच्यांसह मामाचा धरणात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 12:00 PM2021-05-18T12:00:03+5:302021-05-18T12:00:48+5:30

हे तिघे रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातलगांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. यानंतर, गावच्या पोलीस पाटलांनी घटनेची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला दिली. मग...

Uncle along with two Nephew drowned in the dam at Dhanora village in Buldhana district | धानोरा गांवावर शोककळा; दोन भाच्यांसह मामाचा धरणात बुडून मृत्यू

धानोरा गांवावर शोककळा; दोन भाच्यांसह मामाचा धरणात बुडून मृत्यू

Next

जळगांव जामोद (बुलडाणा) : तालुक्यातील धानोरा महासिध्द येथील लघु प्रकल्पात (हत्ती पाऊल धरणात) मामा व दोन भाच्यांचा धरणात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना 18 मे रोजी  सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे, सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तीर्थक्षेत्र धानोरा महासिध्द गावांवर शोककळा पसरली आहे. 

17 मे रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास पुणे येथे जॉब करणारा विनायक गाडगे (वय 27 वर्षे) सध्या लोकडाऊनमुळे धानोरा येथे घरी आला होता. त्याच्या सोबत त्यांच्या काकांचा मुलगा तेजस गाडगे (वय 18 वर्ष) हाही होता. त्यांचे मामा नामदेव वानखडे (वय 43 वर्षे) हे मलकापूर तालुक्यातील  दाताळा येथून आपल्या बहिणीला लग्न समारंभासाठी न्यायला धानोरा येथे आले होते. मामा आणि भाचे हे तिघे जण धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले होते. उन्हाळा असल्याने ते तेथे पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते.

हे तिघे रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातलगांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. यानंतर, गावच्या पोलीस पाटलांनी घटनेची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला दिली. धरण परिसरात शोध सुरू असताना त्यांचे कपडे आणि मोबाईल फोन पाण्याच्या काठावर आढळून आले. तोवर रात्र झाल्याने अंधारात मृतकांचा शोध लागला नाही. आज सकाळी पुन्हा शोध घेतला असता पाण्यामध्ये मृतदेह तरंगताना निदर्शनास आले. यानंतर पोहणाऱ्या लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले गेले. या घटनेमुळे गावात हळ व्यक्त केली जात आहे.
 

Web Title: Uncle along with two Nephew drowned in the dam at Dhanora village in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.