दोन वर्षांत २७ हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 12:11 PM2021-01-01T12:11:22+5:302021-01-01T12:11:38+5:30

Irrigation News जिगाव प्रकल्पामुळे घाटाखालील तालुक्याचा कायापालट होऊन नंदनवन फुलणार असल्याचे स्वप्न या प्रकल्पाविषयी पाहिले जात आहे

In two years, 27,000 hectares of agriculture will get the benefit of irrigation | दोन वर्षांत २७ हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार

दोन वर्षांत २७ हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार

googlenewsNext

- अनिल उंबरकार 
लोकमत न्युज नेटवर्क
शेगाव  : जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव येथे पूर्णा नदीवर जिगाव प्रकल्पाचे काम सुरू आहे. जागा व प्रकल्पामध्ये अंशतः पाणी साठ्याचे नियोजन असून त्याकरिता अतिरिक्त सांडवा तयार करून १८२ दसघमी पाणीसाठा निर्माण होईल व २७ हजार  हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ येत्या दोन वर्षांत देता येईल, तर या पाणीसाठ्यामुळे नदीलगत कुठलेही नुकसान होणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे, ही या भागातील शेतकऱ्यांसाठी शुभवार्ता असून, अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 
जिगाव प्रकल्पामुळे घाटाखालील तालुक्याचा कायापालट होऊन नंदनवन फुलणार असल्याचे स्वप्न या प्रकल्पाविषयी पाहिले जात आहे. आधी पुनर्वसन, मग धरण, तत्त्वाने प्रकल्पातील पुनर्वसनाचे काम  सुरू आहे. परंतु आधी पुनर्वसन नंतर घड भरण, याबाबत सर्वसामान्यांना माहिती नाही. प्रकल्पातील विविध टप्प्यांतील ३३ गावे पूर्ण, तर १५ गावे अंशतः बाधित आहेत. धरण, सांडवा, पुलाची कामे  पूर्ण होत आहे. या प्रकल्पाचे स्वप्न प्रत्यक्षात  साकार व्हावे, हे सर्वसामान्यांसाठी   टप्प्याटप्प्याने सिंचनासाठी व्यक्तिगतरीत्या उचल करून लाभ मिळाला तर राष्ट्रीय उत्पन्नात भर पडणार आहे. या धरणाचे काम ९० टक्के, सांडव्याचे काम ७० टक्के झाले आहे. एकेकाळी धरणाला विरोध करणारेच आता भूसंपादन व पुनर्वसनासाठी चढाओढ करताना दिसत आहेत.
प्रकल्पाच्या टप्पा-१ मध्ये ११ नवीन व ९ जुने गावठाण झाले आहेत; तर भूसंपादनाची १४ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. टप्पा-२ मध्ये १३ नवीन व ८ जुने गावठाण आणि १८ भूसंपादन निवाडे. टप्पा-३ मध्ये १८ नवीन व १२ जने गावठाण व ११ प्रकरणात भूसंपादन. टप्पा-४ मध्ये ८ नवीन व ५ जुने गावठाण आणि ३० भूसंपादन प्रकरणात निवाडे झाले आहे; तर पाचव्या टप्प्यात ३७ भूसंपादनांच्या प्रकरणात निवाडे झाले आहेत. नवीन गावठाणे, जुन्या घरांचा मोबदला व बुडीत क्षेत्रातील खासगी जमिनीच्या प्रस्तावातील काही प्रकरणे १८९४च्या, तर काही प्रकरणे अधिनियम २०१३ नुसार (कलम ४ ते ६ जुन्या व नवीन कलम ११ ते २३ ) प्रक्रिया सुरू आहे. यात संयुक्त मोजणी, चौकशी मोबदल्याकरिता प्रगतीत आहे. विविध प्रशासकीय अडचणी, व्यक्तिगत, कौटुंबिक भांडणे, धोरणात बदल यामुळे मूळ काम बाजूला राहते. प्रकल्पाला विरोध तर पाचवीलाच पूजला आहे, तर दुसरीकडे अनेक गावांतील शेतकरी झपाट्याने वाढणाऱ्या फळबागा विकसित करीत आहेत. मोबदला देणे कायदेशीर व व्यवहार्य असले, तरी उद्देशपूर्तीकरिता कृत्रिम फळबागा वाढविण्याचा सपाटा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. १२ उपसा सिंचन योजनांचे मुख्य पाइप जमिनीत गाडण्यात आले आहेत. बंद नालीतील पाणीपुरवठा पुढे येत आहे. अनेक तांत्रिक, भौतिक, कारदेशीर आव्हानांना सामोरे जाऊन हा प्रकल्प  वाटचाल करीत आहे. आतापर्यंत अंदाजे चार हजार कोटींच्या वर खर्च झाला आहे.  जिगाव प्रकल्प पूर्ण लवकर पूर्ण व्हावा, यासाठी  सर्वांच्या सहकार्याची गरज असून, शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींचाही पुढाकार आवश्यक आहे.    

Web Title: In two years, 27,000 hectares of agriculture will get the benefit of irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.