Two workers died in boiler blast in Khamgam | खामगावात बॉयलरच्या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू
खामगावात बॉयलरच्या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू

खामगाव : वेल्डींग करत असताना बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना येथील ऋषीसंकुल परिसरातील दुर्गाशक्ती फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आज संध्याकाळी ६.३० वाजता घडली. यामध्ये दोन कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

खामगाव येथील भैय्यूजी महाराज ऋषीसंकुल परिसरात दुुर्गाशक्ती फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या ठिकाणी आज संध्याकाळी ६.३० वाजता काही कामगार बॉयलरचे वेल्डिंग करत होते. त्यावेळी अचानक स्फोट होऊन बॉयलरचे झाकण उडाले. काम करत असलेले कामगार फेकले गेले. यामध्ये खामगाव शहरातील फाटकपुरा भागातील रहिवाशी शेख इसरार उर्फ सलमान शेख अबरार (२८) व शौकत कॉलनीतील शेख मुशिर शेख हनिफ (३०) यांचा मृत्यू झाला. या घटनेत फाटकपुरातील फरदीन खान, शेख अमिर अशी त्यांची नावे आहेत. जखमींना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  


Web Title: Two workers died in boiler blast in Khamgam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.