मालवाहतूक करणाऱ्या दोन ट्रकची अमोरासमोर धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 03:30 PM2020-03-30T15:30:31+5:302020-03-30T15:31:20+5:30

मालवाहतूक करणाऱ्या दोन ट्रकची अमोरासमोर धडक झाली.

Two trucks of cargo collide ; One killed | मालवाहतूक करणाऱ्या दोन ट्रकची अमोरासमोर धडक; एक ठार

मालवाहतूक करणाऱ्या दोन ट्रकची अमोरासमोर धडक; एक ठार

googlenewsNext
ref='https://www.lokmat.com/topics/malkapur/'>मलकापूर : दोन मालवाहतूक करणाºया ट्रकची अमोरा-समोर धडक होऊन या धडकेत ट्रक मधील एक जण जागीच ठार झाला तर चार जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पाचपांडे पेट्रोल पंपासमोर घडली. एम.एच. ०४ सी. य.ू २६७४ हा तांदळाने भरलेला ट्रक नागपूरकडून मुक्ताईनगर कडे जात होता. तर ए. पी. ३९ टी. २४९९ हा लसणाने भरलेला ट्रक मुक्ताईनगर कडून नागपूर कडे जात होता. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर पाचपांडे पेट्रोल पंपासमोर या दोन ट्रकची अमोरा-समोर जोरदार धडक घडली. या अपघातात ट्रकमधील एक जण जागीच ठार झाला असून चार जण गंभीर रीत्या जखमी झालेत. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. दरम्यान दोन्ही ट्रक समोरा-समोर धडक झाल्याने ट्रक मधील केबिनमध्ये बसलेले या धडकेत फसले होते. त्यावेळी पोलिसांनी जग्गू मामा क्रेन सर्विस चे मालक अनिल इंगळे व त्यांच्या सहकारी चमूची मदत घेत एपीआय स्मिता म्हैसाय, पोकॉ गजानन बाठे, आनंद माने, शाम शिरसाठ, मंगेश सरके आदींनी मृतक व जखमींना क्रेनच्या सहाय्यने अपघातग्रस्त ट्रकच्या चुराडा झालेल्या केबिन बाहेर बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मृत व जखमी बाबत उपजिल्हा रुग्णालयातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या अपघातातील व्यक्तींची नावे अद्याप पावेतो माहिती नसल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Two trucks of cargo collide ; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.