भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोन जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 06:47 PM2020-07-26T18:47:24+5:302020-07-26T18:49:59+5:30

ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होवून दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यू झाला.

Two persons were killed on the spot in an accident | भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोन जण जागीच ठार

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोन जण जागीच ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होवून दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना देउळगाव राजा येथील बायपास रस्त्यावर क्रीडा संकुल जवळ शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक संजय नगर येथील दोघे मित्र शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच-२०-बीडब्ल्यू-२१९१ द्वारे चिखली मार्गावरून संजय नगर येथे आपल्या घराकडे येत होते. विरुद्ध दिशेने येणारा ट्रक एमपी-१४-एसी-०२८८ व दुचाकीची अमोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये शेख सिराज शेख जमाल उर्फ जुम्मा (वय २७) जागीच ठार झाला तर शाहरुख खान (वय २४, हा गंभीर जखमी झाला. त्यास प्रथमोपचारानंतर जालना येथे हलविण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. अपघात घडला त्या ठिकाणाहून दोघांची घरे हाकेच्या अंतरावर असल्याने नातेवाईकांसह नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. मृतक शेख सिराज यास दीड वर्षाची मुलगी होती तर शाहरुख हा अविवाहित होता. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा केला. मृत दोन्ही युवकांच्या पार्थिवावर स्थानिक कब्रस्तानमध्ये अंत्यविधी करण्यात आला. अपघातास कारणीभूत ट्रक पोलिसांनी जप्त केला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two persons were killed on the spot in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.