बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ६२६ काेराेना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 11:31 AM2021-04-08T11:31:24+5:302021-04-08T11:31:39+5:30

Corona Cases in Buldhana : ४८३९ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६२६ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.

Two more death in Buldana district; 626 Carina positive | बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ६२६ काेराेना पॉझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ६२६ काेराेना पॉझिटिव्ह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात ७ एप्रिल रोजी कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५४६५ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४८३९ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६२६ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३२५ व रॅपीड टेस्टमधील ३०१ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ५८५ तर रॅपिड टेस्टमधील ४२५४ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ४८३९ अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा शहर व तालुक्यात १२६, मोताळा २९, खामगांव शहर व तालुक्यात ५३, शेगांव चार, चिखली शहर व तालुक्यात ३४, मलकापूर ६८, देऊळगाव राजा शहर व तालुक्यात ३७, सिंदखेड राजा १२, मेहकर ९७, संग्रामपूर शहर व तालुका २२, जळगांव जामोद तीन, नांदुरा शहर व तालुका ७१, लोणार शहर व तालुक्यात ७० व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात ६२६ रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती येथील ६५ वर्षीय पुरूष व गांधी नगर मलकापूर येथील ७४ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

७९२ रुग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यात ७९२ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत २४९४१६ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ३७२४५ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ३७२४५ आहे. आज रोजी ३४३५ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल २४९४१६ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ४३२२१ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ३७२४५ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ५६८५ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २९१ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Web Title: Two more death in Buldana district; 626 Carina positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.