Two killed in car-truck crash on Mehkar-Jalna Road | मेहकर-जालना रोडवर कार-ट्रक अपघातात दोन ठार
मेहकर-जालना रोडवर कार-ट्रक अपघातात दोन ठार

ठळक मुद्देखापरखेड घुले शिवारामध्ये नाल्यानजीक ट्रक व कारची समोरासमोर धडक झाली.कारमधील श्रवणराम गुजर व मुक्कानाराम गुजर हे जागीच ठार झाले. बिबी पोलिसांनी ट्रक चालक शेख  आली शेख इब्राहीम यास अटक केली

बिबी (बुलडाणा): कार व ट्रकची समोरा-समोर धडक होऊन कारमधील दोन जण ठार झाल्याची घटना मेहकर जालना रोडवरील खापरखेड घुले शिवारातील जांभळीच्या नाल्यानजीक घडली. हा अपघात शुक्रवारी रात्री ११.३० वाजेदरम्यान घडला असून, ट्रक चालकास बिबी पोलिसांनी अटक केली आहे. 
श्रवणराम गुजर व मुक्कानाराम गुजर (राजस्थान राज्यातील रा. जेवलीया बास, ता. दिडवाणा, जि. नागोर) हे कार (क्रमांक आर-जे-१४-ए-सी-४५५८)ने मेहकरकडून जालन्याकडे जात होते. तर शेख अली शेख इब्राहीम हे ट्रक (एमएच-३८-डी-०६४४)ने जालन्यावरून यवतमाळ जात होते. खापरखेड घुले शिवारामध्ये नाल्यानजीक ट्रक व कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील श्रवणराम गुजर व मुक्कानाराम गुजर हे जागीच ठार झाले. मुतकांना बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. बिबी पोलिसांनी ट्रक चालक शेख  आली शेख इब्राहीम यास अटक केली. पुढील तपास सुरू आहे. 


Web Title: Two killed in car-truck crash on Mehkar-Jalna Road
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.