ट्रक-दुचाकी अपघातात मायलेकांचा मृत्यू; वडील गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:24 AM2020-05-27T10:24:07+5:302020-05-27T10:41:41+5:30

ट्रक व मोटारसायकल च्या भीषण अपघातात मायलेक ठार झाले तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.

truck and motorcycle accident; Son and mother dies, Father injured | ट्रक-दुचाकी अपघातात मायलेकांचा मृत्यू; वडील गंभीर जखमी

ट्रक-दुचाकी अपघातात मायलेकांचा मृत्यू; वडील गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देविमलबाई राजू इरटकर व मुलगा  रोशन ईरटकर यांचा जागीच मृत्यू झाला.राजू शामराव ईरटकर राहणार मोताळा हे गंभीर जखमी झाले.

पिंपळगाव राजा: खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उमरा फाट्यानजीक दुचाकी व ट्रकच्या अपघातामध्ये मायलेकाचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात २७ मे रोजी सकाळी घडल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त कुटूंब हे मोताळा येथील रहिवाशी आहे.
या अपघातामध्ये विमल राजू इरटकर (२८), रोशन इरटकर (६) हे दोघे जागीच ठार झाले तर राजू श्यामराव इरटकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिंपळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अपघाताचे वृत्त कळताच पिंपळगाव राजा पोलिस घटनास्थळी पोहोचले. जखमी व्यक्तीस त्वरित पिंपळगाव राजा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा घडला याची अद्याप स्पष्ट माहिती नसली तरी पोलिस सध्या त्या दिशेने तपास करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. मात्र अपघातामध्ये मायलेकाचा जागीच मृत्यू झाल्यामुळे अपघाताच्या भीषणतेची कल्पना यावी. प्रकरणाचा तपास ठाणेदार सचिन चव्हाण व त्यांचे सहकारी करीत आहेत. मृत झालेल्या मायलेकांचे मृतदेह हे खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Web Title: truck and motorcycle accident; Son and mother dies, Father injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.