अत्यावश्यक सेवा तथा वैद्यकीय कारणावरूनच प्रवासास मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:37 AM2021-04-23T04:37:24+5:302021-04-23T04:37:24+5:30

दुसरीकडे लग्न समारंभासाठी दोन तासांचीच वेळ देण्यात आला असून २५ जणांचीच उपस्थिती राहील असे आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले ...

Travel is allowed only for essential services and medical reasons | अत्यावश्यक सेवा तथा वैद्यकीय कारणावरूनच प्रवासास मुभा

अत्यावश्यक सेवा तथा वैद्यकीय कारणावरूनच प्रवासास मुभा

Next

दुसरीकडे लग्न समारंभासाठी दोन तासांचीच वेळ देण्यात आला असून २५ जणांचीच उपस्थिती राहील असे आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. अन्यथा दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. सोबतच अत्यावश्यक सेवेशी संबंधित कार्यालये त्यांच्याकडील १५ टक्के उपस्थितीतसह सुरू ठेवता येतील. बँक, एटीएम, विमा कार्यालये सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत सुरू राहतील. यासह अन्य काही बाबींचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे. शासकीय कार्यालय प्रमुख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी घेऊन कार्यालयात जास्तीत जास्त कर्मचारी उपस्थितीबाबत निर्णय घेऊ शकतील.

--उपाहारगृहातून घरपोच सुविधा--

मद्यविक्री करणाऱ्या दुकानातून मद्याची विक्री प्रतिबंधित करण्यात आली आहे. मात्र रहिवासी सुविधा असलेले हॉटेल आणि इतर सर्व उपाहारगृरातून घरपोच सेवा पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मद्यविक्रीची दुकाने मात्र उघडता येणार नाहीत. सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत ही सेवा कोविड संसर्ग प्रतिबंधाचे नियम पाळून देता येईल, असे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी २२ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

Web Title: Travel is allowed only for essential services and medical reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.