ज्ञानगंगा, लोणारमधील पर्यटन बंद; मार्गदर्शकांना धान्यवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 04:36 PM2020-04-11T16:36:25+5:302020-04-11T16:36:36+5:30

गाईड म्हणून कार्यरत असलेल्या १४ जणांना मेळघाट व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानतर्फे राशन वाटप करण्यात आले.

Tourism closed in Gyananga, Lonar; Giving food to guides | ज्ञानगंगा, लोणारमधील पर्यटन बंद; मार्गदर्शकांना धान्यवाटप

ज्ञानगंगा, लोणारमधील पर्यटन बंद; मार्गदर्शकांना धान्यवाटप

Next
ref='https://www.lokmat.com/topics/buldhana/'>बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या साथीचा फटका वन्यजीव विभागालाही बसला असून मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत येत असलेल्या वन्यजीव परीक्षेत्रातंर्गतचे पर्यटन ३० एप्रिल पर्यंत बंद करण्यात आले आहे. परिणामी या क्षेत्रात गाईड म्हणून कार्यरत असलेल्या १४ जणांना मेळघाट व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानतर्फे राशन वाटप करण्यात आले.काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यातंर्गत असलेले एक गाईड, ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यामध्ये गाईडचे काम करणारे सात जण, लोणार वन्यजीव विभागातंर्गत काम करणारे सहा जण यांना हे राशन वाटप करण्यात आले आहे. ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन मुळे या अभयारण्य व वन्यजीव विभागातील पर्यटन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणा काम करणाºया गाईडचा (मार्गदर्शक) रोजगाराचा तथा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर या एकूण १४ जणांना राशन वाटप करण्यात आले असून त्यात पाच किलो कणिक, दोन किलो तेल, एक किलो साखर, अर्धा किलो बेसन, एक किलो तरू डाळ, अर्धा किलो मुंग डाळ यासह जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप करण्यात आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वन्यजीव अधिकारी एम. एन. खैरनार यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Web Title: Tourism closed in Gyananga, Lonar; Giving food to guides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.