मलकापूरातील अडीच हजारावर रेशनकार्डधारकांचा धान्य पुरवठा थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 03:10 PM2020-04-08T15:10:29+5:302020-04-08T15:10:35+5:30

२ हजार ६०८ रेशन कार्ड धारकांना धान्य नाही अशी अवस्था आहे.

Supply of ration card holders stops at Malakpur | मलकापूरातील अडीच हजारावर रेशनकार्डधारकांचा धान्य पुरवठा थांबला

मलकापूरातील अडीच हजारावर रेशनकार्डधारकांचा धान्य पुरवठा थांबला

googlenewsNext

- हनुमान जगताप
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: राज्य शासनाकरवी इंन्स्टँक प्राप्त न झाल्याने तांत्रिक अडचणीचा खोडा निर्माण होवुन तालुक्यातील सुमारे २ हजार ६०८ रेशन कार्ड धारकांना धान्य नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे लाँकडाऊन काळात शहर व तालुक्यातील सुमारे८  हजार ९३२ लाभार्थ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी, तालुक्यात ४९ ग्रामपंचायती असून ७२ गावे त्यात समावेशीत आहेत. त्यातील सुमारे १ हजार १७५ रेशकार्डांच्या तर शहरातील सुमारे १हजार ४३३ रेशकार्डांच्या नव्याने आँनलाईन नोंदी मागील काळात झाल्या आहेत.
त्याचा इंन्स्टँक केंद्र,राज्य, जिल्हास्तरावरून तालुका स्तरावर पोहचल्यावर त्या याद्यांना अधिक्रुत रित्या परवानगी मिळून संबंधित रेशन कार्ड धारकांना धान्य पुरवठा केला जातो अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
विद्यमान नव्याने आँनलाईन नोंदणी झालेल्या शहर व तालुक्यातील सुमारे
२हजार ६०८ रेशन कार्ड धारकांचा अन्न व सुरक्षा कायद्यानुसार इंन्स्टँकच तालुकास्तरावर आला नसल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे लाँकडाऊन काळात २ हजार ६०८ रेशकार्डांवर शहर व तालुक्यातील सुमारे ८ हजार ९३२ लाभार्थी मोठ्या संकटात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मलकापूर तालुक्यातील ८१ स्वस्त धान्य दुकानदारांकडून आम्ही याद्या मागविल्या आहेत. तशी माहिती गोळा करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. त्या याद्यांना अन्य व पुरवठा कायद्याने इंन्स्टँक प्राप्त होताच तात्काळ धान्य पुरवठा केला जाईल.
- स्मिता ढोके, अन्न व पुरवठा अधिकारी मलकापूर

पालकमंत्र्यांचे पुरक आश्वासन..।
एनपीएच अंतर्गत आँनलाईन नोंदी करूनही धान्य पुरवठा नाही. या विषयावरून रा.काँ.नेते यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.त्यावर पालकमंत्र्यांनी पुरक आश्वासन देवून तात्काळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्याशी संवाद साधून हा प्रश्न तात्काळ निकाली असे सांगितले.

Web Title: Supply of ration card holders stops at Malakpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.