सातपुड्यातील आदिवासींच्या विकासाचा सूर्योदय थांबला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 01:00 PM2020-10-27T13:00:30+5:302020-10-27T13:00:48+5:30

सातपुड्यातील आदिवासींच्या विकासाला समस्यांचे ग्रहण लागले असून विकासाचा सूर्योदय जागीच थांबला आहे.

Sunrise of tribal development in Satpuda stopped! | सातपुड्यातील आदिवासींच्या विकासाचा सूर्योदय थांबला!

सातपुड्यातील आदिवासींच्या विकासाचा सूर्योदय थांबला!

Next

- अझहर अली

संग्रामपूर : निसर्गसाधन संपन्नतेने नटलेला संग्रामपूर तालुका सातपुड्यातील डोंगर दऱ्यात वसलेला आहे. या तालुक्यातील १९ गावांमध्ये आदिवासी लोक राहतात. मात्र सातपुड्यातील आदिवासींच्या विकासाला समस्यांचे ग्रहण लागले असून विकासाचा सूर्योदय जागीच थांबला आहे. सोनाळा लगत सायखेड, आलेवाडी, चिचारी, शेंबा, सालवण गुंमठी, नवी चूनखेडी, हडीयामाल, निमखेडी, शिवाजीनगर, ४० टपरी, दयालनगर, शिवणी, वसाली, जूनी वसाली, पिंगळी बु., पिंगळी जहां, बारखेड इत्यादी गावे वाड्या आहेत. सायखेड येथे शासकीय आश्रम शाळा असून या शाळेची स्थापना सन १९७७ मध्ये झालेली आहे. या आदिवासी आश्रम शाळेत वगर्ग १ ते १० पर्यंत शिक्षणाची सोय आहे. सन २००९ पासून शाळेच्या इमारतीचा २ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास आदिवासी विभागाने मान्यता दिलेली आहे.  मात्र जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत इमारत बांधकाम करण्यास चालढकल करण्यात येत आहे. सायखेड येथील सर्व आदिवासींच्या दृष्ष्टीने महत्वाच्या या शाळेची इमारत इतरत्र बांधकामासाठी काहिंनी हालचाली चालविल्या आहेत. तर सायखेड येथे इमारत उभी राहणे गरजेचे आहे. असे आदिवासींचे मत आहे. शेंबा व गुंमठि नवी चूनखेडी या गावांचे पिंगळी गावाजवळ पूनर्वसन झाले आहे. येथे वीज पोहचली नाही. येथील गावठाण योजनेचे काम पूर्ण झाले असून आदिवासींच्या घरात उजेड पाडण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार असा सवाल विचारल्या जात आहे. तर सातपुड्यातील वारीहनुमान धरणा लगत २० किमी परिघात वसाली, हडीयामाल, जूनी वसाडी, चिचारी, निमखेडी, शिवाजीनगर, शिवणी, दयालनगर, शेंबा, सालवण, नवी चूनखेडी ही गावे वसलेली आहेत. वाण धरणातून शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अकोला-बुलडाणा जिल्ह्यात सर्वदूर झालेला आहे. मात्र उपरोक्त गावांना धरण उशाला अन कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ आली आहे. या गावांना शुध्द पाण्याचा पुरवठा १४० गाव योजनेतून होत नाही

Web Title: Sunrise of tribal development in Satpuda stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.