Sting Operation : रस्ता खोदकामात निघणाऱ्या भंगाराची बेभाव विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 01:40 PM2019-07-28T13:40:20+5:302019-07-28T13:40:57+5:30

खोदकामा दरम्यान, निघणाºया विविध वस्तू साहित्याची मातीमोल भावात विक्री करणारे एक रॅकेटच शहरात सक्रीय झाल्याचे दिसून येते.

Sting Operation: copper wire sell illiagle | Sting Operation : रस्ता खोदकामात निघणाऱ्या भंगाराची बेभाव विक्री!

Sting Operation : रस्ता खोदकामात निघणाऱ्या भंगाराची बेभाव विक्री!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : रस्ता खोदकामादरम्यान, बीएसएनल तसेच इतर कंपन्यांचे महागडे केबल,अ ॉप्टीक फायबर, पाणी पुरवठ्याची पाइपलाइन लोखंडी सुटे भाग आदी मोठ्याप्रमाणात काढण्यात आहेत. खोदकामा दरम्यान, निघणाºया विविध वस्तू साहित्याची मातीमोल भावात विक्री करणारे एक रॅकेटच शहरात सक्रीय झाल्याचे दिसून येते. मात्र, याकडे पोलिस आणि संबंधित प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
शहरातून जाणाºया महामार्गाच्या विस्तारीकरणातंर्गत विकमसी चौक ते सुटाळा पर्यंत टप्प्याने खोदकाम करण्यात येत आहे. शहरातून जाणारा रस्ता एका बाजूने खोदण्यात येते. दरम्यान, रस्त्याच्या कडेला भारत संचार निगम लिमीटेडचे तांब्याचे केबल, आॅप्टीकल केबल तसेच इतर मोबाईल कंपन्यांची महागडी केबल आहे. पाणी पुरवठ्याची पाइपलाइनही या ठिकाणी असून, लोखंडी डक्ट इतर लोखंडी तसेच ताब्यांचे साहित्य खोदकामाच्या दरम्यान, बाहेर काढल्या जात आहे. खोदकामातील मलबा आणि या वस्तू डम्पींग ग्रांऊड तसेच इतर ठिकाणी टाकल्या जात आहे. यामध्ये असलेले भंगार साहित्य तसेच खोदकामा दरम्यान निघणारे साहित्यावर नजर ठेवून काही जण या साहित्याची मातीमोल भावात विक्री करीत आहे.

असे करण्यात आले स्टिंग आॅपरेशन!
खोदकामातील मलबा घेवून जाणाºया ट्रकचा पाठलाग करण्यात आला. त्यावेळी मलबा टाकल्या जात असलेल्या ठिकाणी आधीच काही जण दुसºया एका टिप्परमध्ये आलेल्या मलब्यातील भंगार साहित्याची विल्हेवाट लावत असल्याचे आढळले. खोदकामातील आणि मलब्यातील भंगार साहित्य टोळक्याने काही जण भंगाराच्या दुकानात विक्री करीत असल्याचेही ‘लोकमत’च्या पथकाला दिसून आले.


आॅप्टीकल केबलच्या पाईपची ४ रुपये किलोने विक्री!
विविध मोबाईल कंपन्यांनी केबल सुरक्षीत रहावी यासाठी प्लास्टिक पाईप टाकले आहेत. खोदकामा दरम्यान, हे पाईप तुटत आहेत. या तुटलेल्या पाईपची चक्क ४ रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.


तांब्याच्या केबलची जाळून विक्री!
मोबाईल कंपन्यांची महागडी वायरही भंगारात विकल्या जात असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. खोदकामादरम्यान तुटलेली केबल, तांब्याचे तार आणि लोखंडी डक्ट चोरून भंगारात विकल्या जात आहे. तांब्याची केबल विकण्यापूर्वी तिच्यावरील प्लास्टिकचे आवरण जाळल्या जाते.

Web Title: Sting Operation: copper wire sell illiagle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.