खामगावात ‘शक्तीमान’ करणार फवारणी; दोन अत्याधुनिक मशीन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:19 PM2020-04-03T12:19:49+5:302020-04-03T12:20:06+5:30

खामगावातील विविध भागात तिसºया टप्प्यातील फवारणी केली जाणार आहे.

Spraying ' in Khamgaon; Two advanced machines enter | खामगावात ‘शक्तीमान’ करणार फवारणी; दोन अत्याधुनिक मशीन दाखल

खामगावात ‘शक्तीमान’ करणार फवारणी; दोन अत्याधुनिक मशीन दाखल

googlenewsNext

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:   शहरात निर्जंतुकीकरण द्रावणाच्या फवारणीसाठी अत्याधुनिक ‘शक्तीमान’ या मशीन खामगावात दाखल झाल्या आहेत.  एकाच वेळी दोन लाख चौरसफूट फवारणीची क्षमता असलेल्या दोन मशीनद्वारे आता खामगावातील विविध भागात तिसºया टप्प्यातील फवारणी केली जाणार आहे.
कोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील सर्व शहरांमध्ये सॅनेटायझरची फवारणी करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार सर्वच पालिका, महापालिका आणि नगर पंचायती फवारणीला प्राधान्य देत आहेत. खामगाव नगर पालिका प्रशासनाकडून शहरातील ३२ वार्डांमध्ये फवारणी करण्यात येत आहे. दरम्यान, ही फवारणी अधिक गतीमान करण्यासाठी युनाटेड फॉस्फरस लिमीटेडतर्फे निर्मित शक्तीमान प्रोटेक्टर-६०० या दोन मशीन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी या मशीनद्वारे फवारणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. खामगावात या मशीन उपलब्ध करून देण्यासाठी वितरक श्रीकिसन पुरवार यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर तातडीने या मशीन आॅपरेटर आणि तंत्रज्ञानांच्या केवळ मजुरीवर शहरात दाखल झाल्या.
 
एकाचवेळी दोन लाख चौरसफूटावर फवारणी!
मुंबई, पुणे आणि अमरावती नंतर खामगाव शहरात अत्याधुनिक मशीनद्वारे फवारणी केली जाणार आहे. एकाचवेळी सुमारे पाच एकराच्या पट्यावर म्हणजेच दोन लाख चौरस फुटावर फवारणी करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे.  एकावेळी सहा फुट ते ४० फुट रुंदीवर तर ११ फूट उंचीवर ही मशीन फवारणी करू शकते. अद्यावत मशीनसह तंत्रज्ञ तथा कंपनीचे व्यवस्थापक आशीष पिसे यांच्या नेतृत्वात संतोष फाळके, महेश चव्हाण हे आॅपरेटर देखील खामगावात दाखल झालेत.
 
मुंबई आणि अमरावतीच्या धर्तीवर खामगावात फवारणीसाठी युपीएल कंपनीतर्फे निर्मित शक्तीमान प्रोटेक्टर-६०० या मशीन आणण्यात आल्या आहेत. शुक्रवारी शहरातील सर्वच प्रभागात फवारणी केली जाईल.
- संजयमुन्ना पुरवार
उपाध्यक्ष, नगर परिषद, खामगाव.
 

Web Title: Spraying ' in Khamgaon; Two advanced machines enter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.