बुलडाणा जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प  ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 04:29 PM2020-09-11T16:29:23+5:302020-09-11T16:29:55+5:30

गुरूवारी झालेल्या जोरदार पावसाने दोन मोठे आणि सहा मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.

Six medium projects 'overflow' in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प  ‘ओव्हर फ्लो’

बुलडाणा जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प  ‘ओव्हर फ्लो’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात गुरूवारी झालेल्या जोरदार पावसाने दोन मोठे आणि सहा मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. खकडपूर्णा प्रकल्पात ८९.७३ टक्के जलसाठा असून पेनटाकळी प्रकल्पाचा जलसाठा ८६.९४ टक्यांवर पोहचला आहे. पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, तोरणा आणि उतावळी १०० टक्यांवर पोहचले असून या प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसेच मन प्रकल्पाचा जलसाठा ९८.७५टक्यावर पोहचला आहे.
जिल्ह्यात गुरुवारी अनेक तालुक्यामध्ये जोरदार पाउस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे.
११ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले. त्यामध्ये पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, तोरणा आणि उतावणी या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पैनगंगा नदीवरील पेनटाकळी प्रकल्पाचे तीनवक्रद्वारे २० से.मी उघडण्यात आले आहे. नदीपात्रात ६०.३३ घनमिटर प्रती सेकंट इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. खडकपूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्पाचे तीन वक्रद्वारे ३० से.मी न उघडण्यात आली आहेत.तसेच मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.


नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यातील दोन मोठ्या आणि सहा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहेत. त्यामुळे, नद्या दुथळी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाउस सुरू असल्याने जलपातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, नदी काठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण ३०.०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Six medium projects 'overflow' in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.